Priyanka Chopra Sell Apartment : बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बॉलिवूडमध्ये तिची छाप सोडल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये देखील तिच्या अभिनयानं सगळ्यांवर जादू केली आहे. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळते. आता अशी माहिती समोर आली आहे की कथितपणे प्रियांकानं तिचे अंधेरी वेस्ट लोखंडवाला कॉम्पलॅक्समध्ये असलेले तिचे चार अपार्टमेंट्स हे जवळपास 16.17 कोटी रुपयांमध्ये विकले आहेत. तिचे हे सगळे फ्लॅट हे ओबेरॉय स्काय गार्डनमध्ये आहेत. इंडेक्सटॅपकडून मिळालेल्या माहितीनुसार
ओबेरॉय स्काय हार्डन प्रोजेक्टमध्ये प्रियांका चोप्राचे तीन फ्लॅट हे 18 व्या मजल्यावर होते आणि एक 19 व्या मजल्यावर आहे. 18 व्या मजल्यावर असलेला फ्लॅट हा 1075 स्क्वेअर फीटचा आहे आणि तो फ्लॅट प्रियांकानं 3.45 कोटींमध्ये विकला आहे. तर ज्या व्यक्तीनं हा फ्लॅट खरेदी केला आहे त्यानं या फ्लॅटसाठी 17.26 लाख स्टॅम्प ड्यूटी दिली आहे. मिळालेल्या माहितीतून हे लक्षात आलं आहे की त्यात एक कार पार्किंग आहे.
तर प्रियांकाचा 18 व्या मजल्यावरच आणखी एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिनं 2.85 कोटींमध्ये विकला आहे. हा फ्लॅट 885 स्क्वेअर फीटचा आहे आणि या फ्लॅटसाठी 14.25 लाख रुपयांची स्टॅम्प ड्यूटी देण्यात आली आहे. माहितीनुसार, हे लक्षात आलं की या फ्लॅटसोबत देखील एक कार पार्किंग आहे. तर 19 व्या मजल्यावर तिसरा फ्लॅट आहे. हा फ्लॅच 3.52 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. तर हे घर 1100 स्क्वेअर फीटचा आहे. या घरासाठी 21.12 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी दिली आहे.
हेही वाचा : तमन्ना भाटियासोबत ब्रेअकप अन् काहीच दिवसात विजय वर्मा 'पार्टनर'सोबत; फोटो शेअर करत म्हणाला...
प्रियांकाच्या चौथ्या अपार्टमेंटविषयी बोलायचं झालं तर 1985 स्क्वेअर फीट एरिया असलेला हा फ्लॅट 6.35 कोटींना विचारण्यात आला. या डीलसाठी 31.75 लाखांची स्टॅम्प ड्युटी देण्यात आली आहे. या दोन्ही फ्लॅट्समध्ये पार्किंग स्पेस आहे. 3 मार्च 2025 ला रजिस्ट्रेशन करण्यात आलं. या सगळ्या अपार्टमेन्ट्सना सचदेवा कुटुंबानं खरेदी केलं आहे. या कुटुंबात रजिनी त्रिलोक सचदेवा, श्रुती गौरव सचदेवा, स्नेहा डांग सचदेवा, रौनक त्रिलोक सचदेवा हे सदस्य आहेत. दरम्यान, 2023 मध्ये प्रियांकानं अंधेरीमधल्या तिच्या दोन प्रॉपर्टी अभिषेक चौबे यांना विकली होती. ते एक स्क्रीन रायटर आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी ही प्रॉपर्टी 6 कोटींना खरेदी केली होती.