Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' सुपरस्टार अभिनेत्याच्या बहिणीने 11306 कोटींचा मालक असणाऱ्या उद्योगपतीसोबत थाटला दुसरा संसार, 14 वर्षांची मुलगी...

Bollywood Superstars Sister got Married to Businessman : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्याची बहीण जिनं 11306 कोटींचा मालक असणाऱ्या उद्योगपतीसोबत थाटला दुसरा संसार

'या' सुपरस्टार अभिनेत्याच्या बहिणीने 11306 कोटींचा मालक असणाऱ्या उद्योगपतीसोबत थाटला दुसरा संसार, 14 वर्षांची मुलगी...

Bollywood Superstars Sister got Married to Businessman : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींचं दुसरं लग्न झालं आहे. त्यातील काहींना त्यांच्या पहिल्या लग्नातून मुलं असतात. त्याविषयी तर आधी अनेकांना माहितही नव्हतं त्याचं कारण म्हणजे तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. पण आता सगळं काही लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना कळतं. आज आपण अशा एका निर्माती विषयी जाणून घेणार आहोत. जिनं दोन वेळा लग्न केलं. पहिल्या लग्नातून तिला मुलगी झाली आणि दुसऱ्या लग्नानंतर ती तीन मुलांची सावत्र आई झाली. आता तुम्ही विचार करत असाल कोण आहे ही निर्माती तर हिंट ही आहे की तिचा भाऊ हा सुपरस्टार आहे आणि वहिणी लेखिका आहे. 

तुम्ही सिमर भाटिया हे नाव ऐकलं असेल. सिमर ही अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिमर ही फक्त 26-27 वर्षांची आहे आणि इंडस्ट्रीमध्ये तिनं पदार्पण केलं आहे. तर तिची मामा-मामी हे नेहमीच चर्चेत असतात. मामा सध्या त्याच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तर मामी लेखिका आहे. सिमरच्या आईनं दोन लग्न केली आहेत. 

आपण अल्का भाटिया ही लोकप्रिय निर्माती आहे. तिनं Fugly या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याशिवाय तिनं अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' या चित्रपटाची देखील निर्मिती केली होती. ही अल्का भाटिया ही अक्षय कुमार उर्फ राजीव भाटियाची छोटी बहीण आहे. अल्का ही 55 वर्षांची आहे. तिनं 1997 मध्ये वैभव कपूरशी लग्न केलं आणि लेक सिमर भाटियाला जन्म दिला होता. पण काही कारणांमुळे ते विभक्त झाले आणि मग त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अल्का यांनी सिमरला एकटीनं लहाणाचं मोठं केलं. त्यावेळी भाऊ अक्षय कुमारनं तिला प्रत्येकवेळी साथ दिली होती. 

त्यानंतर 2012 मध्ये अल्का भाटियानं बिझनेसमॅन सुरेंद्र हीरानंदानी अर्थात हीरानंदानी ग्रुपचे मालक यांच्याशी लग्न केलं. दोघांचं हे दुसरं लग्न होतं. त्यांचं पहिलं लग्न प्रीति हीरानंदानी यांच्यासोबत झालं होतं. सुरेंद्र हे 55 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी घटस्फोट दिला होता. त्यांना दोन मुली नेहा हीरानंदानी आणि कोमल हीरानंदानी आहेत. त्याशिवाय त्यांना एक मुलाग असून त्याचं नाव हर्ष हीरानंदानी आहे. सुरेंद्र यांच्या वडिलांच्या 94 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं होतं. दरम्यान, त्या दोघांच्या या लग्नानं अक्षयचं कुटुंब आनंदी नव्हतं. सुरेंद्र हीरानंदानी यांचं नाव फोर्ब्सच्या ग्लोबल बिलेनियलच्या यादीत आहे. त्यांची नेटवर्थ ही 1.3 बिलियन डॉलर अर्थात 1,13,06,26,49,700 रुपये (11306 कोटी) आहे.

हेही वाचा : पत्नी सुनीतानं सगळ्यांसमोरच गोविंदाला केलं Lip-Kiss; आई-वडिलांचा रोमान्स पाहून अशी होती मुलांची प्रतिक्रिया

जेव्हा अल्का भाटियाचं दुसरं लग्न झालं तेव्हा त्यांची मुलगी सिमर भाटीया ही 14 वर्षांती होती. तोवर अल्का भाटियानं तिचं खासगी आयुष्य जास्त पब्लिक केलं नव्हतं. त्यामुळे त्याविषयी जास्त कोणालाही माहिती नाही आहे. पण अक्षयच्या कुटुंबाला तिचं लग्न मान्य नसलं तरी त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. तिचं लग्न हे पंजाबी परंपरेनुसार झालं होतं. त्याचे फोटो समोर आले आहेत. अल्का भाटियाचं वय हे 55 वर्ष आहे. तर सुरेंद्रचं वय हे 70 वर्ष आहे. त्या दोघांमध्ये 15 वर्षांचं अंतर आहे. 

Read More