Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रत्येक चित्रपट हिट ठरल्यानंतर Kartik Aaryan ला भेट मिळते नवीन कार? कियाराचा खुलासा

Kartik Aaryan : कार्तिक आर्यन आणि कियारा यांचा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट काल प्रदर्शित झाला होता. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये असताना कियारानं कार्तिकला त्याचा चित्रपट हिट ठरल्यानंतर त्याला निर्माते कार गिफ्ट करतात हे सांगितले होते. त्यावर कार्तिकनंं मजेशीर उत्तर दिले आहे. 

प्रत्येक चित्रपट हिट ठरल्यानंतर Kartik Aaryan ला भेट मिळते नवीन कार? कियाराचा खुलासा

Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट काल 29 जुन रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली नसली तरी देखील निर्मात्यांना विकेंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. कार्तिक आणि कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना दुसऱ्यांदा पडद्यावर पाहायला मिळाली. दरम्यान, कियारानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनविषयी एक मोठा खुलासा केला आहे. चित्रपट हिट झाल्यावर निर्माते कार्तिकला एक कार गिफ्ट करतात असं कियारानं सांगितलं तर त्यावर कार्तिकनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

कार्तिक आणि कियारा यांनी मिर्ची प्लसला नुकतीच एक मुलाखत दिली होती. यावेळी कियारानं कार्तिक आर्यनच्या टी-शर्टकडे इशारा केला. या टी-शर्टवर कारची एक प्रिंट होती. हे टी-शर्ट दाखवत कियारा म्हणाली की ही एक साइन आहे. कार्तिकनं हे टी-शर्ट परिधान करण्याचं  कारण,  जेव्हा पण कार्तिकचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतो तेव्हा निर्माते त्याला एक कार भेट करतात. त्यावर खोडकर अंदाजात उत्तर देत कार्तिक म्हणतो ते माझं नाव आहे. कार्तिक (Car-tik)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे कार्तिकनं खुलासा केला की भूषण यांनी 'भूल भुलैया 2' ला मिळालेल्या ब्लॉकबस्टर हीटनंतर कार्तिकला गाडी गिफ्ट केली होती. त्यानंतर कार्तिकनं त्यानं परिधान केलेल्या कारच्या प्रिंटकडे इशारा करत सांगितलं की मला आशा आहे की सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या सक्सेसनंतर मला ही कार मिळेल. 

हेही वाचा : पहिल्या डेटवरच इंटिमेट? हो- नाही म्हणताना असे फसले Tamannaah - Vijay, सिक्रेट अखेर समोर

भूषण कुमार यांनी कार्तिकला मॅक्लोरेन जीटी ही कार भेट केली होती. कार्तिक आर्यननं त्याला भेट मिळालेल्या या गाडीचा फोटो देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या कारची किंमत ही 4.7 कोटी आहे. या गाडीचा फोटो शेअर करत कार्तिक म्हणाला होता की "चायनीज खाण्यासाठी नवीन टेबल भेट म्हणून मिळाला आहे. मेहनतीचं फळ मिळतं हे ऐकलं होतं. पण इतकं मोठं असेल माहित नव्हतं. भारतातली पहिली मॅक्लोरेन जीटी पुढच्यावेळी प्रायव्हेट जेट सर." असं कॅप्शन देखील भूषणनं केलं होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, या चित्रपटात कार्तिक, कियारा, सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सनं केलं आहे

Read More