Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अमिताभ बच्चन यांना पैसे घेऊन मारण्याची सुपारी घेतली', या अभिनेत्यावर होता गंभीर आरोप

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना पैसे घेऊन मारण्याची सुपारी घेतल्याचा या अभिनेत्यावर होता आरोप. कोण आहे तो अभिनेता? 

'अमिताभ बच्चन यांना पैसे घेऊन मारण्याची सुपारी घेतली', या अभिनेत्यावर होता गंभीर आरोप

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी हिट आणि अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, अशातच आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील एका अभिनेत्यावर अमिताभ बच्चन यांना पैसे घेऊन मारण्याची सुपारी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांना 'कुली' चित्रपटातील एका सीन दरम्यान पुनीत इस्सर यांनी अमिताभ बच्चनला ठोसा मारला होता. यामध्ये अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यावेळी ही घटना झाल्यानंतर पुनीत यांच्यावर मोठा परिणाम झाला होता. 

बॉलिवूड अभिनेते पुनीत इस्सर हे त्यांच्या दमदार अभिनयामुळे ओळखले जातात. त्यांनी महाभारतात दुर्योधनाच्या भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यानंतर पुनीत यांचा कुली या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा खूप चर्चेत होता. 1982 मधील या चित्रपटाच्या सेटवरील काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. 

'पैसे घेऊन अमिताभ बच्चन यांना मारण्याची सुपारी'

'कुली' चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सर आले होते. चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना पुनीत यांनी अमिताभ बच्चन यांना ठोसा मारला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यासोबत पुनीत यांच्यावर अमिताभ बच्चन यांनी मारण्याची सुपारी घेतल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. 

दरम्यान, चित्रपटात एक सीन होता ज्यामध्ये ते दोघे लढत असतात. हा एक अॅक्शन सीन होता. ज्यामध्ये शूटिंग करत असताना पुनीत यांच्याकडून अमिताभ बच्चन यांना पोटात दुखापत झाली होती. त्यांची प्रकृती खूपच नाजूक झाली होती. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. त्यावेळी पुनीत यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. काही जणांनी पैसे घेऊन अमिताभ बच्चन यांना मारण्याची सुपारी घेतली होती का? असा देखील आरोप केल्याचं पुनीत यांनी सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

 आरोपांनंतर पुनीत यांना मिळेना काम

पुनीत यांच्यावर गंभीर आरोप झाल्यामुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नव्हते. त्यांना अनेक प्रोजेक्टमधून काढून देखील टाकण्यात आलं. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. परंतु, अमिताभ बच्चन यांनी या गोष्टीचा कधीच राग व्यक्त केला नाही. अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयात बोलवून माझ्याशी बोलून मला दिलासा दिला. ते म्हणाले की, पुनीत यामध्ये तुझी काय चूक नाही असं अमिताभ बच्चन यांनी पुनीत यांना सांगितलं. 

Read More