Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिद्धार्थनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

जिममध्ये व्यायाम करणं अभिनेत्याला पडलं महागात...

सिद्धार्थनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

मुंबई : सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार यांचे आज सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई अभिनेत्याची विचारणा करण्यासाठी रुग्णालयात उपस्थित होते. 

वयाच्या 46 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. पुनीतच्या प्रकृती बद्दल सांगताना डॉ.रंगानाथ नायकने एएनआयला सांगितलं  की, 'सकाळी 11 वाजता अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत त्रास होत असल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. याआधी अभिनेत्याला एका लोकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.'

 पुनीतची प्रकृती फार चिंताजनक होती. त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असल्याचं देखील डॉक्टर म्हणाले. पुनीतच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला. याआधी  अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांन  धक्का बसला होता. सिद्धार्थचं निधन झालं असल्याचं सत्य अद्यापही त्याचे चाहते पचवू शकले नाहीत. 

Read More