Marathi News> मनोरंजन
Advertisement

पंजाबी गाण्याचा 'हा' डान्स व्हिडिओ व्हायरल...

सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही तुमची कला, कौशल्य अगदी सहज लोकांपर्यंत पोहचवू शकता.

पंजाबी गाण्याचा 'हा' डान्स व्हिडिओ व्हायरल...

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही तुमची कला, कौशल्य अगदी सहज लोकांपर्यंत पोहचवू शकता. त्यामुळे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. असाच एक डान्स व्हिडिओ पुन्हा लोकांसमोर आलाय. हा व्हिडिओ सुमारे लाखो लोकांना पाहिला आहे. हा व्हिडिओ Manpreet Toor नावाच्या एका युट्युब चॅनलने अपलोड केला आहे.

४६ लाखाहुन अधिक लोकांनी पाहिला हा व्हिडिओ

पंजाबी सिंगर गुरू रंधावाचे एक गाणे लाहोर मधील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. तरुणाईला या गाण्याची क्रेझ असून त्यावर थिरकताना पाहायला मिळते. या गाण्यावर दोन मुलींनी सुंदर नृत्य केले आहे. हा व्हिडिओ ५ जानेवारीला अपलोड करण्यात आला असून २५ जानेवारीपर्यंत तो ४६ लाखांहुन अधिक लोकांनी पाहिला आहे.

सोशल मीडिया एक वरदान

युट्युबमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओतील एका मुलीचे नाव मनप्रीत आहे. ती कॉलिफोर्नियात कोरयोग्राफर आहे. तिचा डान्स व्हिडिओ चागंलाच व्हायरल झाला. अशा प्रकारच्या चांगल्या वापरामुळे सोशल मीडिया एक वरदान ठरत आहे. 

Read More