Marathi News> मनोरंजन
Advertisement

पुष्कर - मंजिरीची फ्रेश जोडी होणार 'अदृश्य'

जाणून घ्या असा होणार त्यांचा हॉरर आणि थ्रिलर रूप...  

पुष्कर - मंजिरीची फ्रेश जोडी होणार 'अदृश्य'

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मालिका आणि चित्रपटांचं शुटिंग बंद करण्यात आलं होतं. मात्र आता सर्वच क्षेत्रातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस 'अदृश्य' या आगामी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघायला मिळणार आहेत . नुकतेच या चित्रपटाचे शुटिंग डेहराडून येथे सुरू झाले आहे . बॉलिवूडचे प्रथितयश सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

fallbacks

 

कबीर लाल यांनी आज पर्यंत वेलकम बॅक, परदेस , ताल , हम आपके दिल में रेहते है' या व अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. तर अजय कुमार सिंग हे निर्माते लवली वर्ल्ड प्रॉडक्शन्स या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करत आहेत .

'अदृश्य' हा, मंजरी फडणीस यांचा दुसरा मराठी चित्रपट असेल. त्यामुळे तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठकणार आहे. आता नव्याने चित्रीत करण्यात येणारा 'अदृश्य' चित्रपट हा सुपरहिट हॉरर आणि थ्रिलर स्पॅनिश चित्रपट चे रुपांतर आहेत. आता रसिक प्रेक्षकांना या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघण्याची उत्सुकता असणार यात शंका नाही.

Read More