Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pushpa 2: या व्यक्तीने 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पाहिला, आता चित्रपटाचा रिव्ह्यू होतोय व्हायरल

या व्यक्तीने अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' रिलीज होण्यापूर्वीच पाहिला आहे. सध्या या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Pushpa 2: या व्यक्तीने 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पाहिला, आता चित्रपटाचा रिव्ह्यू होतोय व्हायरल

Pushpa 2: साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काही दिवसांपूर्वीच अशा बातम्या आल्या होत्या की सुकुमारचा हा चित्रपट 6 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होणार आहे. अशातच आता 'पुष्पा 2' चित्रपटाचा क्लायमॅक्स व्हिडीओ लीक झाला आहे. चित्रपटातील सीन व्हायरल होताच सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. 

दरम्यान, 'पुष्पा 2' चित्रपटासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, त्याने 'पुष्पा 2' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पाहिला आहे. इतकच नाही तर या चित्रपटाचा रिव्ह्यू देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथे आम्ही संगीतकार देवी श्री प्रसाद यांच्याबद्दल बोलत आहोत. ज्यांनी 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत एक मोठे विधान केलं आहे. 

चित्रपट पाहिल्यानंतर देवी श्री प्रसाद काय म्हणाले? 

'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले, नुकताच मी 'पुष्पा 2' चित्रपटाचा पहिला भाग पाहिला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर माझे मन हेलावले आहे. या चित्रपटाची स्टोरी इतकी मजेदार आहे की चंद्रबोस आणि मी टाळ्या वाजवत राहिलो. एक क्षण असा आला की चित्रपटात ब्रेक येतोय असे वाटले. त्याच वेळी कथेतील सस्पेन्स वाढत गेला. सुकुमारचे दिग्दर्शन खूपच जबरदस्त आहे. त्यासोबतच अभिनेता अल्लू अर्जुनने चित्रपटात अप्रतिम अभिनय केला आहे. हा चित्रपट गेल्या वेळच्या तुलनेत प्रचंड  हिट होणार आहे. असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संगीतकार देवी श्री प्रसाद यांची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या विधानाकडे लोक एखाद्या चित्रपटाच्या समीक्षेप्रमाणे बघत आहेत. याआधी देखील चित्रपटातील दो सिंगल्स, पुष्पा आणि सूस्की व्हायरल होत आहेत. अशातच आता चित्रपटाबद्दल रिव्ह्यू व्हायरल झाल्यानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. देवी श्री प्रसाद यांनी म्हटलं आहे की, या चित्रपटात अनेक रोमांचक गोष्टी बघायला मिळणार आहेत. 

चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता 

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची चाहते देखील प्रचंड आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनसोबतच अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे. 

Read More