Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pushpa पाहिलात? मग ही बातमी तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची

  साऊथ चित्रपटांची व्याप्ती आता केवळ साऊथपुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर त्याची जादू बॉलिवूडमध्ये ही पाहायला मिळाली आहे.

 Pushpa पाहिलात? मग ही बातमी तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची

मुंबई :  साऊथ चित्रपटांची व्याप्ती आता केवळ साऊथपुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर त्याची जादू बॉलिवूडमध्ये ही पाहायला मिळाली आहे. साउथसोबतच अल्लू अर्जुनच्या पुष्पाने हिंदी भाषेतही चांगली कमाई केली आहे. बॉलिवूड सिनेमांना याचा मोठा फटका बसला आहे. 

सोशल मीडियावर पाहिले तर चित्रपटाची गाणी आणि संवाद सगळीकडे चर्चेत आहेत. या चित्रपटाने परदेशातही मोठी कमाई केली आहे.अनेक परदेशी लोकांनी या सिनेमातील डायलॉग आणि गाण्यांचे व्हिडिओही बनवले आहेत.

त्याचवेळी, चाहते आता पुष्पा 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेकर्स पुष्पा 2 बनवण्याची तयारी करत आहेत.

या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत निर्माते अनेक गोष्टींची काळजी घेणार आहेत.निर्माते चित्रपटाच्या सिक्वेलच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करू शकतात, ज्याचा भारतीय प्रेक्षकांवर परिणाम होणार आहे.

चित्रपटाचा बहुतांश भाग हिंदी प्रेक्षकांवर केंद्रित असेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे पुष्पाच्या येणाऱ्या दुसऱ्या भागात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ही कल्पना चित्रपटासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना असे वाटते की लोकांवर मोठा प्रभाव टाकण्यासाठी स्क्रिप्ट पॉलिश करणे खूप महत्वाचे आहे. एवढेच नाही तर चर्चा आहे की पुष्पाच्या सिक्वेलच्या शूटिंगची तयारीही सुरू झाली आहे.

Read More