Pushpa Pushpa Memes : काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा 2' या चित्रपटातील गाण्याची एक झलक निर्मात्यांनी प्रदर्शित केली. येत्या 1 मे रोजी हे गाणं प्रदर्शित होणार आहे. त्या आधी निर्मात्यांनी 20 सेकंदात चित्रपटाची झलक दाखवली आहे. देवी श्रीप्रसादनं हे गाणं संगीत बद्ध केलं असून त्यावरून सध्या सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
निर्मात्यांनी शेअर केलेल्या त्या 20 सेकंदाच्या क्लिपमध्ये गायक पुष्पा, पुष्पा, पुष्पा, पुष्पा राज असं वेगळ्या आवाजात बोलताना दिसतो. त्यानंतरमध्येच कोरस ऐकायला मिळतोय तर हे गाणं 1 मे रोजी सकाळी 11.07 वाजता प्रदर्शित होणार आहे. पण एकीकडे प्रेक्षक या सगळ्याची प्रतिक्षा करू शकत नाहीत. तर तेवढ्या वेळात ते अनेक मीम्स शेअर करताना दिसत आहेत. सुरुवातीला त्यांनी दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता रवी तेजाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रवी तेजा बोलतो "पुष्पा, पुष्पा, पुष्पा म्हणजे काय? बीचवर जाऊन शेंगदाणे विक." नेटकऱ्यानं हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे की 'रवी तेजा हे काय...'
What is this ra nana #Pushpa2FirstSingle pic.twitter.com/wpMfCogGgg
— Aadhii (@TemperLepaku) April 24, 2024
दुसऱ्या नेटकऱ्यांनी तो ऑडियो वापरत 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या Nuvvostanante Nenoddantana या चित्रपटातील रघू बाबूचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्रिशाची ट्रेनमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर आणखी एक चाहत्यानं शिव राजकुमारचा पुष्पा पुष्पा हा 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या वेधा या कन्नडा चित्रपटातील शेअर केला आहे.
Pushpa Pushpa pic.twitter.com/MBStldG5cc
— Lok (@TeluguOchu) April 24, 2024
यात काही मीम्स आहेत ज्यात चाहते त्यांनी रिअॅक्शन दाखवताना दिसत आहेत. तर एका नेटकऱ्यांनी महेश बाबूचा गुन्तूर कारम या चित्रपटातील एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा शेअर करत त्यानं प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरा नेटकरी म्हणाला की फहाद फासिल आणि अल्लू अर्जुनचा देखील एक व्हिडीओ 'पुष्पा : द राइज'मधून शेअर केला आहे. तर एका नेटकऱ्यानं अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा सामी सामी या गाण्यावरचा डान्स करतानाचा व्हिडीओला पुष्पा पुष्पा पुष्पा हा ऑडियो दिला आहे.
Orey #Pushpa2FirstSinglepic.twitter.com/rCtmEzlbcF
— Deva (@Salaar_tz) April 24, 2024
हेही वाचा : विशेष मुलांसाठी, पालकांसाठी 'मायलेक'चे स्पेशल स्क्रिनिंग
ME JUST LISTENING FOR FIRST TIME
— ICON deepAAk (@DEEPAK25_AACULT) April 25, 2024
@alluarjun #Pushpa2TheRuleFirstSingle #Pushpa2FirstSingle pic.twitter.com/Lax3j8zKrg
PUSHPA PUSHPA - @alluarjun pic.twitter.com/fCoWGmqek5
— Musugu Donga (@MusuguDhonga) April 24, 2024
Just promo tho AA BHAI trend setting chastundu ra Pushpa Pushpa with Pushpa
— GHANI BHAI (@BheemlaBoy1) April 24, 2024
#Pushpa2FirstSingle #Pushpa2TheRule pic.twitter.com/DWxifTvsS2
दरम्यान, या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर सुकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका आणि फहाद महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर आता हा भाग 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तर निर्मात्यांनी या चित्रपटाचा एक स्पेशल टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रदर्शित केला आहे.