Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pushpa Saami Song : रश्मिकापेक्षाही भन्नाट 'सामी' डान्स करणारा भेटला, Video Viral

चित्रपटातील गाण्यांचीही सध्या दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. 

Pushpa Saami Song : रश्मिकापेक्षाही भन्नाट 'सामी' डान्स करणारा भेटला, Video Viral

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या (Pushpa )या चित्रपटाची हवा गेल्या बऱ्याच दिवसांपासून कलाजगतामध्ये पाहायला मिळत आहे. गाणी, डायलॉग आणि जबरदस्त लूकच्या बाबतीत 'पुष्पा'नं चाहत्यांची मनं जिंकली. 

चित्रपटातील गाण्यांचीही सध्या दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. विविध रिल्स आणि व्हिडीओच्या निमित्तानं या चित्रपटातील गाण्याचे बहुविध वर्जनही दिसून येत आहेत. 

यातील काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. त्यातच एक व्हिडीओ पाहून, हा तर रश्मिकापेक्षाही भन्नाट डान्स करतोय अशीच प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत. 

'सामी सामी' या गाण्यावर ठेका धरणारा हा अवलिया आहे, टांझानिया बॉय म्हणून ओळखला जाणारा किली पॉल. 

किली पॉलला ओळखीची गरज नाही. जर तुम्ही सोशल मीडिया युजर आहात तर हा चेहरा तुमच्या ओळखीचाच असावा. 

जर तुम्ही सोश मीडिया युजर नसाल, तर हा व्हिडीओ पाहा तुम्हाला सर्वकाही कळेल. 

तर... किली पॉल यानं यावेळी 'सामी सामी' या गाण्यावर थिरकत सर्वांचीच मनं जिंकली आहेत. 

अॅमेझॉन प्राईमच्या पेजवरून त्याचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेला असतानाच त्याच्याशी संबंधित असा एखादा व्हिडीओ व्हायरल होणं याचे थेट परिणाम अर्थातच चित्रपटाच्या कमाईत होणार यात शंका नाही. 

मुख्य म्हणजे किलीचा हा डान्स पाहून अनेकांनीच पुन्हा एकदा या गाण्याबाबत कुतूहल व्यक्त करत त्यासंबंधिचे अनेक व्हिडीओ नजरेखालून टाकण्यास सुरुवात झाली आहे. 

Read More