Marathi News> मनोरंजन
Advertisement

कधी स्वत:च्या लेकीला किस ते आता मनीषा रानीसोबतची वर्तवणूक, पुन्हा एकदा महेश भट्ट ट्रोल

बिग बी ओटीटीचा फिनाले नुकताच पार पडला. आणि या शोची विजेती ठरली लोकप्रिय YouTuber एल्विश यादव. या रिअॅलिटी शोमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्टने देखील सहभाग घेतला होता. या शोच्या टॉपमध्ये तिने स्थान मिळवलं होतं.  शोदरम्यान पूजा अनेकदा चर्चेत आली होती. विशेषत: जेव्हा तिचे वडील महेश भट्ट तिला भेटण्यासाठी शोमध्ये आले होते, तेव्हा याविषयी बरीच चर्चा झाली होती.

कधी स्वत:च्या लेकीला किस ते आता मनीषा रानीसोबतची वर्तवणूक, पुन्हा एकदा महेश भट्ट ट्रोल

मुंबई : नुकताच बिग बी ओटीटीचा फिनाले पार पडला. आणि या शोची विजेती ठरली लोकप्रिय YouTuber एल्विश यादव. या रिअॅलिटी शोमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्टने देखील सहभाग घेतला होता. या शोच्या टॉपमध्ये तिने स्थान मिळवलं होतं.  शोदरम्यान पूजा अनेकदा चर्चेत आली होती. विशेषत: जेव्हा तिचे वडील महेश भट्ट तिला भेटण्यासाठी शोमध्ये आले होते, तेव्हा याविषयी बरीच चर्चा झाली होती.

खरंतर महेश भट्ट पूजा भट्टला भेटायला आले होते, पण जेव्हा ते बिग बॉसच्या घरात पोहोचले तेव्हा शोची स्पर्धक मनीषा राणीसोबतच्या त्यांच्या वागण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. महेश भट्ट कधी मनीषाचा हात धरताना तर कधी तिला मिठी मारताना दिसले. जेव्हा या शोचं फुटेज समोर आले तेव्हा सोशल मीडिया युजर्स  संतप्त झाले आणि महेश भट्ट यांनी मनीषाला अनकंफर्टेबल  केल्याचा आरोप केला.

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत पूजा भट्टने तिच्या वडिलांच्या वागण्यावर मौन सोडलं आहे. यावरं बोलताना पूजा म्हणाली, लोकांना जगाकडे त्यांच्या दृष्टीकोनातून बघायचम आहे, हे मला जाणवलम. जर त्यांना महेश भट्ट यांचं वर्तन शोमध्ये अयोग्य वाटलं, तर मला वाटते की त्यांचा मेंदू चुकीचा विचार करतो. प्रत्येकाला स्पष्टीकरण देण्यासाठी माझ्याकडे इतकी बँडविड्थ नाही.

मला वाटतं की शोमधील सर्व सहभागींनी विशेषतः मनीषाने त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. बिग बॉसच्या घरातील मी कदाचित शेवटचा सदस्य होते ज्याला ते भेटायला आले होते. मी खूप कमी वेळ त्यांच्याबरोबर घालवला. पूजाने बिग बॉसमधील तिच्या प्रवासाबाबतही अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने सांगितलं की, शोमधून बाहेर आल्यानंतर आता ती अनेक गोष्टींचं आत्मचिंतन करणार आहे. आता मर्यादित गोष्टींसह जीवन जगायला शिकले आहे, असेही तो म्हणाला.

याआधी महेश भट्ट यांनी एका मासिकासाठी महेश आणि पूजा भट्ट (Pooja Bhatt) यांनी बोल्ड (lip lock) फोटोशूट केलं. यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पूजाच्या सौंदर्यावर महेश भट्ट इतके भाळले की त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचीही इच्छा बोलून दाखवली होती. मुलीच्या सौंदर्याची अशी प्रशंसा करत भट्ट यांनी जणू सर्वांना हादरा दिला होता. 

Read More