Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan Khan ची सुटका होताच, लोकप्रिय अभिनेत्यात दडलेला 'बाप' म्हणतो...

कलाविश्वातूनही अनेक कलाकारांनी या निकालाचं स्वागत केलं.   

Aryan Khan ची सुटका होताच, लोकप्रिय अभिनेत्यात दडलेला 'बाप' म्हणतो...

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला गुरुवारी अखेर मोठा दिलासा मिळाला. मागील 25 दिवसांपासून ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबीनं कारवाई केल्यामुळं आर्यन कोठडीत होता. कोठडीत असल्याच्या पहिल्या दिवसापासून आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखनं वकिलांची मोठी फौज कामाला लावली होती. अखेर माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीही त्यांचं कसब दाखवून देत अखेर आर्यन आणि त्याच्यासह अडचणीत सापडलेल्या अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचाला जामीन मिळवून दिला. 

आर्यनला जामीन मिळणं ही बाबा शाहरुख खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा दिलासा देऊन गेली. इतकंच नव्हे, तर कलाविश्वातूनही अनेक कलाकारांनी या निकालाचं स्वागत केलं. 

एकिकडे चाहते शाहरुखच्या निवासस्थानी पोहोचले तर, दुसरीकडे हा निर्णय नेमका किती मोठा होता याची प्रचिती सेलिब्रिटींच्या पोस्ट पाहून आली. 

अभिनेता आर. माधवन यानं आर्यनला जामीन मिळाल्यानंतर एक अभिनेता म्हणून नव्हे, तर एक वडील म्हणून व्यक्त होत आपली प्रतिक्रिया दिली. 

'देवा तुझे आभार... एक वडील म्हणून मला फार दिलासा मिळाला आहे. आता यापुढे सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टीच घडो... हीच सदीच्छा', असं ट्विट त्यानं केलं. 

माधवनने एका कलाकारापेक्षा एक वडील म्हणून व्यक्त होणं जास्त उचित समजलं आणि तशीच प्रतिक्रियाही दिली. 

शाहरुखच्या मागे उभी असणारी कलाकारांची ही फौज पाहता, किंग खानलाही दिलासा मिळत असेल यात शंका नाही. 

Read More