Marathi News> मनोरंजन
Advertisement

Race 3 ची 100 करोड क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री !

सलमान खानची बॉलिवूडमधील ओळख 'दबंग'स्टार अशी आहे. 

Race 3 ची 100 करोड क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री !

मुंबई : सलमान खानची बॉलिवूडमधील ओळख 'दबंग'स्टार अशी आहे. मात्र 'रेस 3' प्रदर्शित झाल्यानंतर आता तोच बॉक्सऑफिसचा 'सिकंदर' आहे  हे सिद्ध झालं आहे. रेस 3 या चित्रपटाचे समीक्षकांचे रिव्ह्यूज फारसे सकारात्मक नसले तरीही अवघ्या तीन दिवसात रेस 3 ने बॉक्सऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.  

सलमानची चाहत्यांना ईदी 

सलमान खान 'ईद'च्या मुहुर्तावर चहत्यांसाठी हमखास एक सिनेमा घेऊन येतो. त्यानुसार रेस या सीरीजमधील 'रेस 3' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी  29.17, दुसर्‍या  दिवशी 34.18 कोटी आणि तिसर्‍या दिवशी 39.16कोटी  चा गल्ला जमवत विकेंडला 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

 

रेमो डिसुजाचं दिग्दर्शन 

रेस 3 या चित्रपटाचं दिग्दर्शन रेमो डिसुजाने केलं आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत जॅकलीन फर्नांडीज, डेजी शाह, साकिब सलीम, अनिल कपूर आणि  बॉबी देओल प्रमुख भुमिकेत आहेत. या सिनेमाचे सॅटेलाईट राईट्सदेखील रिलिजपूर्वीच विकण्यात आले आहेत. रेस 3 ची रीलिजपूर्वीच 'दंगल'वर मात, बॉलिवूडचा 'असा' पहिलाच सिनेमा

Read More