Marathi News> मनोरंजन
Advertisement

Race 3 ची बॉक्सऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं

सलमान खानच्या रेस 3 बाबत खूपच चर्चा होती.

Race 3 ची बॉक्सऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं

मुंबई : सलमान खानच्या रेस 3 बाबत खूपच चर्चा होती. या चित्रपटाला समीक्षकांकडून फारसं कौतुक मिळत नसलं तरीही बॉक्सऑफिसवर मात्र या चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. अवघ्या तीन दिवसामध्ये या चित्रपटाने 100 कोटींचा पल्ला पार केला आहे. 

रेस 3 चं रेकॉर्डब्रेक कलेक्शन 

रेस 3 चित्रपट रिलीज होऊन आता 6 दिवस झाले आहेत. मात्र बॉक्सऑफिसवर या चित्रपटाची पकड अजूनही दमदार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने 142.01 कोटींची कमाई केली आहे. बॉक्सऑफिसवरील घौडदौड पाहता या विकेंडला बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा पल्ला पार करू शकतो. 

जगभरातील रेस 3 चं कलेक्शन पाहता या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. मेट्रो सिटीमध्ये या चित्रपटाची घौडदौड कमी झालेली असली तरीही लहान शहरातील सिंगल स्क्रिनवर याअ चित्रपटाचा जलवा कायम आहे. 

Read More