Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सुरज पांचोलीला जिमपेक्षा अॅक्टिंग क्लासची जास्त गरज'

बॉलीवूडमधल्या कोणत्या अभिनेत्याला जीमपेक्षा अभिनय क्लासेसची गरज आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला.

'सुरज पांचोलीला जिमपेक्षा अॅक्टिंग क्लासची जास्त गरज'

मुंबई : राधिका नेहमी आपल्या बोल्ड अंदाज आणि स्टेटमेंटसाठी चर्चेत असते. यावेळी तिने थोड्या हटके स्टेटमेंट केल्या आहेत. नेहा धुपियाने विचारलेल्या प्रश्नांना तिने तडातड उत्तरे दिली आहेत. 

ओवर रेटेड अभिनेता 

सर्वात जास्त ओवर रेटेड अभिनेता कोण ? असा प्रश्न तिला विचारला गेला. यावर तिने सुशांत सिंह असे उत्तर दिले. 

अभिनयाच्या क्लासची गरज 

त्यानंतर बॉलीवूडमधल्या कोणत्या अभिनेत्याला जीमपेक्षा अभिनय क्लासेसची गरज आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने सुरज पांचोलीचे नाव घेतले. 

राजकुमार गप्प 

राधिका आपटे आणि राजकुमार राव हे दोघे नेहा धुपियाचा शो‘वोग बीएफएफ’चे शुट करण्यासाठी सेटवर आले होते.

राधिकाच्या अशा स्टेटमेंटनंतर राजकुमार सरप्राइज झाला. पण वादात न अडकण्यासाठी त्याने यावर कोणतेच मत व्यक्त केले नाही.  

Read More