Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियांका-दीपिकानंतर राधिकालाही हॉलिवूडचं तिकीट

सध्या राधिका दिग्दर्शक मिचेल विंटरबॉटम यांचा सिनेमा 'वेडिंग गेस्ट'मध्ये देव पटेल याच्यासोबत काम करतेय.

प्रियांका-दीपिकानंतर राधिकालाही हॉलिवूडचं तिकीट

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला तुम्ही आत्तापर्यंत मराठी, हिंदी, बांग्ला, तामिळ आणि तेलुगू सिनेमांत काम करताना पाहीलं असेल पण आता हिच अभिनेत्री लवकरच हॉलिवूड सिनेमांतही दिसणार आहे. दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर राधिकालाही हॉलिवूडचं तिकीट मिळाळंय... राधिकाला एकाच वेळी दोन - दोन हॉलिवूड सिनेमांची ऑफर मिळालीय. 

अक्षय कुमारसोबत 'पॅडमॅन' या सिनेमात अत्यंत साध्या महिलेच्या भूमिकेत यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच राधिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. रिजनल सिनेमांनंतर आता राधिकानं इंग्लिश सिनेमांकडे वाटचाल केलीय.

सध्या राधिका दिग्दर्शक मिचेल विंटरबॉटम यांचा सिनेमा 'वेडिंग गेस्ट'मध्ये देव पटेल याच्यासोबत काम करतेय. 

याशिवाय निर्माता दिग्दर्शक बनी लायडिया डीन यांच्या एका सिनेमात स्तना काटिक आणि सराह मॅगन थॉमस यांच्यासोबतही राधिका दिसणार आहे. हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. 

Read More