Marathi News> मनोरंजन
Advertisement

Hot Pic : राधिका मदानकडून पूलमधील आपला हॉट फोटो शेअर, सीक्रेट लोकेशनवर घेतेय सुट्ट्यांचा आनंद

कोरोना काळात अभिनेत्री राधिका मदन फिरायला गेली असल्याने नेटकरी तिला सोशल मिडियावर ट्रोल करत आहेत

Hot Pic : राधिका मदानकडून पूलमधील आपला हॉट फोटो शेअर, सीक्रेट लोकेशनवर घेतेय सुट्ट्यांचा आनंद

मुंबई : छोट्या पडद्यावरुन बाहेर पडून आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने भुरळ पाडणारी अभिनेत्री राधिका मदन सध्या ओटीटीमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच ती काही काळ मुंबईपासून दूर सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.

कोरोना काळात ती फिरायला गेली असल्याने नेटकरी तिला सोशल मिडियावर ट्रोल करत आहेत, सुंदर राधिका मदनने लाल रंगाच्या बिकिनीमध्ये तिचा फोटो शेअर केला. या फोटोच्या खाली राधिकाने दिलेलं कॅप्शन सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. ''मी मालदीवमध्ये नाही आहे''. सगळेच सुंदर फोटो जे पूलमध्ये काढले आहेत ते जरुरी नाही आहेत की ते मालदिवमधले असतीत अशा आशयाचं कॅप्शन लिहलं असून ती मालदीवमध्ये नसल्याचे सांगत आहे.

स्विमिंग पूलमध्ये लाल रंगाच्या बिकिनीमधील राधिकाची पोझ कातिलाना आहे. आपल्या साधेपणाने सिनेमांमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी राधिकाचा हा धाडसी लूक तिच्या चाहत्यांसाठी सरप्राईजपेक्षा कमी नाही.

काही दिवसांपूर्वी राधिकाने एक एयरपोर्टवरील धमाल व्हिडिओ शेअर केला होता. जिथे ती डान्सिंग स्टार मायकल जॅक्सनचा प्रसिद्ध 'मून वॉक' करताना दिसली. असं वाटत होतं की राधिका मालदीवला रवाना झाली आहे पण फोटो शेअर करुन राधिका "मालदीवमध्ये नाही" असं म्हणत आहे. परंतु ती नक्की कुठे आहे, त्यासाठी चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राधिका मदन दिल्लीची रहिवासी आहे. तिने डासिंग रिएलिटी शो झलक दिखला जा मध्ये भाग घेतला होता. राधिका लवकरच 'फील्स लाइक इश्क' आणि 'रे' या वेबसिरीजमध्ये दिसणार असून यावर्षी या सिरीज रिलीज होण्याची शक्यता आहे. तिचा एक चित्रपट, शिद्दत, रिलीजसाठीदेखील तयार आहे. ज्याची घोषणा कोरोना आटोक्यात येताच होईल.

Read More