Marathi News> मनोरंजन
Advertisement

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चा टीझर प्रदर्शित...

एकता कपूरच्या आगामी वेब सिरीज 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चा फायनल टीझर प्रदर्शित झाला आहे.

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चा टीझर प्रदर्शित...

मुंबई : एकता कपूरच्या आगामी वेब सिरीज 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चा फायनल टीझर प्रदर्शित झाला आहे. ६ एपिसोडच्या या वेब सिरीजचा हा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर मानला जात आहे.

टीझर अत्यंत बोल्ड

३ जानेवारीपासून याचे प्रसारण सुरू होईल. हा व्हिडिओ बालाजीच्या ऑफिशियल इंस्‍टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात करिश्मा शर्मा मुख्य भुमिकेत आहे. त्याचबरोबर यात सिद्धार्थ गुप्ता आणि रिया सेन देखील झळकणार आहेत. टीझर अत्यंत बोल्ड आहे. 

पहिल्या पोस्टरनंतरच चर्चेत

‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या पहिल्या पोस्टरनंतरच हा चित्रपट चर्चेत आला होता. ज्यात करिश्मा शर्मा टॉपलेस दिसत होती. ‘रागिनी एमएमएस’ची ही तिसरी फिल्म आहे. ही दोन मुलींची गोष्ट आहे. ज्यांच्या सोबत काही विचित्र घटना घडतात. याची निर्मिती एकता कपूरने केली आहे. तर दिग्दर्शन सुयश वादवाकर यांनी केले आहे. 

 

Read More