Marathi News> मनोरंजन
Advertisement

समंथाचं डायरेक्टरबरोबर अफेअर? त्याच्या पत्नीची सूचक Insta स्टोरी; म्हणाली, 'माझ्याबद्दल जे कोणी...'

Director Wife On Cozy Photo With Samantha Ruth Prabhu: घटस्फोटीत अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण आलेलं असतानाच डायरेक्टरच्या पत्नीची इन्स्टा स्टोरी चर्चेत

समंथाचं डायरेक्टरबरोबर अफेअर? त्याच्या पत्नीची सूचक Insta स्टोरी; म्हणाली, 'माझ्याबद्दल जे कोणी...'

Samantha Ruth Prabhu Viral Photo: "ते रिलेशनमध्ये आहेत की नाही?" अशी चर्चा सध्या मागील काही दिवसांपासून अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या चाहत्यांमध्ये सुरु आहे. यामागील कारण म्हणजे समंथाने काही दिवसांपूर्वीच 'सिटाडेल: हनी बनी'चा दिग्दर्शक राज निदीमोरुसोबत पोस्ट केलेला एक खास पोटो. दोघांमधील कथित प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा असतानाच सोशल मीडियावर वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. असं असतानाच आता राजची पत्नी शामली डे हिने केलेल्या एका पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत राजची पत्नी शामली कधीच या दोघांच्या कथित नातेसंबंधांवर व्यक्त झाली नव्हती. मात्र नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केलेली एक पोस्ट सध्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून व्हायरल होत आहे.

डायरेक्टरच्या पत्नीची सूचक पोस्ट

काही दिवसांपूर्वीच समंथाने राजबरोबरचा विमानामधील एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये समंथा बाजूच्या सीटवर बसलेल्या राजच्या खांद्यावर प्रेमाने डोकं ठेऊन बसली आहे. हा सेल्फी समंथानेच क्लिक केला होता. या फोटोनंतर राज आणि समंथाच्या कथित अफेरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. यापूर्वी काही वेळा अशा चर्चा झाल्या आहेत. मात्र नेहमीच राजची पत्नी याबद्दल गप्पा राहिल्याचं दिसून आलं. मात्र आता राजची पत्नी शामलीने समंथा आणि राजच्या या विमानातील फोटोची चर्चा सुरु असतानाच एक सूचक पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून केली आहे.

त्या स्टोरीमध्ये नेमकं आहे काय?

"माझ्याबद्दल जे कोणी विचार करत आहेत ज्यांच्यासाठी मी अनेक आशीर्वाद आणि प्रेम पाठवतेय. जे मला पाहत आहेत, जे मला ऐकून घेत आहेत, जे माझ्याबद्दल ऐकत आहेत, जे माझ्याशी बोलत आहेत. जे मला समजून घेत आहेत. जे मला वाचण्याचा प्रयत्न करत आहेत जे मला टाळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे मला आज भेटले आहेत, त्या सर्वांनाच माझे आशीर्वाद आणि प्रेम!" असं शामलीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे. तुम्हीच पाहा हा स्क्रीनशॉट...

fallbacks

थेट कोणाचा उल्लेख नाही पण...

या पोस्टमध्ये शामलीने कोणाचाही थेट उल्लेख केलेला नाही. मात्र नेटकऱ्यांनी आपआपलं तर्क लावत हे सारं समांथा आणि राजच्या फोटोसंदर्भातच असल्याचं म्हटलं आहे. समंथा ही दाक्षिणात्य अभिनेता नागचैतन्यची पर्वाश्रमीची पत्नी आहे. काही वर्षांपूर्वीच हे दोघे विभक्त झाले आहेत. त्यानंतर अनेक कलाकारांबरोबर समंथचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र पहिल्यांदाच समंथाने अशाप्रकारे नाव जोडलं जात असलेल्या एखाद्या व्यक्तीबरोबरचा फोटो स्वत:च्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

अनेकांच्या भुवया उंचावल्या

समंथा आणि राजचा हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे आता यावर राजच्या पत्नीने सूचक विधान केल्यानंतर खरोखरच राज आणि समंथाचं काही सुरु आहे का याबद्दलची चाहत्यांची उत्सुकता अजून वाढली आहे, हे मात्र नक्की!

Read More