Marathi News> मनोरंजन
Advertisement

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत सध्या सतत चर्चेत असते. 

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषपासून वेगळं झाल्यानंतर रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत सध्या सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याला कोविडची लागण झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधील ऐश्वर्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा ऐश्वर्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये एडमिट असल्याचं दिसत आहे.

हे फोटो स्वतः ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत ऐश्वर्याने स्वतः सांगितलं आहे की, तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये का दाखल करावं लागलं. ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर 4 फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दिसत आहे की, ऐश्वर्या हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे आणि तिच्या हाताला बँन्डेज आहे.

तिच्या बेडजवळ एक महिलाही उभी आहे जिच्याशी ऐश्वर्या गप्पा मारताना दिसत आहे. फोटो शेअर करत ऐश्वर्याने लिहिलं आहे की, 'कोविडआधीचं आयुष्य आणि कोविडनंतरचं आयुष्य... बॅक टू हॉस्पिटल ताप आणि चक्कर येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणि मला काय माहित नाही! मात्र जेव्हा सगळ्यात प्रेमळ, इंस्पायरिंग आणि मोटिवेशनल डॉक्टर तुम्हाला भेट देते आणि तुमच्यासोबत वेळ घालवते तेव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही. महिला दिनाची किती छान सुरुवात झाली. मॅडमचा आदर.

Read More