Marathi News> मनोरंजन
Advertisement

दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांच्यासह सेटवरील ८ जणांना कोरोना

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे सध्या सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. कित्येक महिन्यांपासून देशावर असलेलं

दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांच्यासह सेटवरील ८ जणांना कोरोना

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे सध्या सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. कित्येक महिन्यांपासून देशावर असलेलं कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. दरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांच्या अन्नाथे या चित्रपटाच्या सेटवर ८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. त्याचसोबत आता रजनीकांतदेखील क्वारंटाइन झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये १४ डिसेंबरपासून हे चित्रीकरण सुरु होतं. मात्र, सेटवर ८ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.

“चित्रपटाच्या सेटवर उपस्थित लोकांपैकी ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. तसंच रजनीकांत हे हैदराबादमध्ये क्वारंटाइन होतील किंवा चेन्नईलादेखील परत येऊ शकतात”, असं रजनीकांत यांचे प्रवक्ते रियाज अहमद यांनी सांगितलंय.

Read More