Marathi News> मनोरंजन
Advertisement

रजनीकांत यांना राग अनावर, शांत स्वभावाच्या सुपरस्टारला नेमकं काय झालं?

साऊथ सिनेमांचे स्टार रजनीकांत कायम शांत स्वभावामुळे ओळखले जातात. त्यांना आतापर्यंत कधीच रागावलेलं किंवा चिडलेलं पाहिलं नाही. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत थलायवा अतिशय भडकलेले दिसत आहेत. 

रजनीकांत यांना राग अनावर, शांत स्वभावाच्या सुपरस्टारला नेमकं काय झालं?

जेव्हापासून रजनीकांत यांनी आपला इंडस्ट्रीतील प्रवास सुरु केलाय तेव्हापासून ते शांत स्वभावासाठी ओळखले जातात. कार्यक्रमातही ते अनेकदा शांत दिसतात. मात्र सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये थलायवा अतिशय रागावलेले दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मीडियाच्या लोकांवर रजनीकांत भडकलेले दिसतात. 

व्हिडीओमध्ये अभिनेता रजनीकांत 20 सप्टेंबर रोजी 'वॅट्टेयन' ऑडियो लाँचच्या अगोदर चेन्नई एअरपोर्टवर पोहोचले. असं म्हटलं जातं की, याच ठिकाणी कनगराजच्या 'कुली' चे काही सीन्स शुटिंग करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना माजी अभिनेता आणि डीएमके नेता उदयनिधी स्टॅलिन यांच्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा रजनीकांत मीडियावर भडकले. 

रजनीकांत मीडियावर संतापले

व्हिडिओमध्ये, पापाराझी उदयनिधी स्टॅलिन तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री बनण्याच्या अफवांवर विचारताना दिसत आहेत. त्यावेळी संतप्त झालेल्या रजनीकांत यांनी रागावून उत्तर दिलं आहे. 'मला राजकीय प्रश्न विचारू नका. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे.'

आधीच केली होती विनंती

अभिनेत्या रजनीकांत यांनी अनेकदा मीडियाला प्रश्न विचारू नका अशी विनंती केली आहे. नंतर ते शांत झाला आणि उरलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांना विचारण्यात आले की 'वेट्टय्यान' ऑडिओ लॉन्चसाठी कोण कोण उपस्थित राहणार आहे. त्यावर त्याने उत्तर दिले, 'मला माहित नाही सर.'

'Vettaiyan' बद्दल अपडेट

त्यांनी विमानतळावर उपस्थित पत्रकारांना सांगितले की, 'वेट्टय्यान' येत आहे आणि त्यासाठी आपण उत्सुक आहोत. रजनीकांत यांना या चित्रपटातील भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाला की, 'हे वेगळे असेल.'

Read More