Marathi News> मनोरंजन
Advertisement

आईचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर राजीव खंडेलवालची पोस्ट

दोन दिवसांपूर्वी माझ्या आईचे देहांत झाल्याचे ट्विट राजीवने केले. त्याची आई विजयलक्ष्मी खंडेलवालला कॅन्सर होता.

आईचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर राजीव खंडेलवालची पोस्ट

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि हॅण्डसम अभिनेता राजीव खंडेलवाल संदर्भातील अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. राजीवची आई जग सोडून गेली. त्याने आपल्या ट्विटर हॅंडलवरून यासंदर्भात माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी माझ्या आईचे देहांत झाल्याचे ट्विट राजीवने केले. त्याची आई विजयलक्ष्मी खंडेलवालला कॅन्सर होता.

अशी आहे पोस्ट 

 माझ्या आईचे परवा देहावसन झाले. ती गेले काही दिवस कॅन्सरशी लढत होती. या लढाईत आम्ही तिच्या सोबत होतो. पण ती यातून बाहेर आली नाही. ती नेहमी माझ्या आत राहिल. कॅन्सरसोबतच्या युद्धात आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्वांच मनापासून आभार. विना अट आम्हाला प्रेम देणाऱ्या सर्वांचा मी ऋणी राहिन.

Read More