Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आता तरी मोठे व्हा...', विभक्त होण्यासाठी कायद्याची मदत घेणारं कपल पुन्हा एकत्र येताच नेटकरी संतापले

मुलीच्या जन्मानंतर विभक्त होण्याच्या मार्गावर असलेलं हे Couple पुन्हा एकत्र, तो फोटो सांगतोय बरंच काही  

'आता तरी मोठे व्हा...', विभक्त होण्यासाठी कायद्याची मदत घेणारं कपल पुन्हा एकत्र येताच नेटकरी संतापले

मुंबई : आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी विभक्त होण्यासाठी कायद्याची मदत केली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) पत्नी चारु असोपा (Charu Asopa)सोबत घटस्फोट घेण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना राजीवने पत्नीसोबत एक रोमाँटिक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामुळे राजीव आणि चारु यांच्या नात्यात नक्की काय सुरु आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राजीवने चारूसोबत फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

राजीवने पत्नीसोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लाल गुलाबाच्या फुलाचं इमोजी ठेवला आहे. त्याची पोस्ट पाहून अनेकांनी दोघे एक सुंदर दिसत आहेत... अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने, 'आता तरी मोठे व्हा, प्रत्येत नात्यात वाद होतात...' अशी कमेंट केली आहे. सध्या राजीव आणि चारुचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

चारु आणि राजीव यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव झियाना असं आहे. चारु सोशल मीडियावर लेकीसोबत सतत फोटो शेअर करत असते. झियानाच्या जन्मानंतर काही महिन्यात चारु राजीवला सोडून माहेरी बिकानेरला निघून गेली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चारु असोपाने 7 जून 2019 रोजी सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केलं. या दोघांना झियाना नावाची मुलगी आहे. चारू तिच्या मुली आणि पतीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. 

यासोबतच चारू फेसबुकवर तिचा ब्लॉगही चालवते आणि छोट्या छोट्या गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करते. आता चारु आणि राजीवच्या आयुष्यात कोणत्या घटना घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Read More