Marathi News> मनोरंजन
Advertisement

Show च्या प्रसिद्धीसाठी जोडप्याने मांडला संसाराचा बाजार, गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचल्यानंतर...

संसारापेक्षा शो महत्त्वाचा? प्रसिद्ध जोडप्याचा मोठा निर्णय पाहून तुम्हीही म्हणाल यांना नात्यांचं महत्त्वं आहे की नाही...  

Show च्या प्रसिद्धीसाठी जोडप्याने मांडला संसाराचा बाजार, गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचल्यानंतर...

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक जोडपे आहेत, जे लग्नाच्या काही वर्षांनंतर विभक्त झाले. पण सध्या ज्या जोडप्याबद्दल चर्चा रंगत आहे, त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय फक्त शोच्या प्रसिद्धीसाठी घेतल्याची चर्चा रंगत आहे. या जोडप्याचं नाव आहे चारु असोपा (charu asopa) आणि राजीव सेन (Rajiv Sen). गेल्या काही दिवसांपासून चारु आणि राजीव विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. एवढंच नाही तर, घटस्फोटासाठी दोघांनी न्यायालयाची पायरी देखील चढल्याची चर्चा होती.  (charu asopa first husband)

पण आता दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. दोघांना अनेक ठिकाणी मुलीसोबत स्पॉट देखील करण्यात आलं. चारुने एका व्लॉगच्या माध्यमातून विभक्त होणार नसल्याची माहिती चाहत्यांना दिली.  (Rajiv-charu)

चारु म्हणाली, 'राजीवला सर्व काही ठिक करायचं होतं, पण मला घटस्फोट हवा होता. कारवाईच्या आदल्या दिवशी राजीव आणि मी गोष्टी एकत्र बसून आमच्या नात्यात असलेल्या सर्व अडचणी दूर केल्या...' (Rajiv-charu personal life)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चारु पुढे म्हणाली, 'वकिलांना देखील आम्ही आमचा निर्णय सांगितला. त्यांनी देखील आम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.' राजीव  आणि चारुच्या या निर्णयानंतर अनेकांनी याला 'स्क्रिप्टेड ड्रामा' असं म्हटलं आहे.  (Rajiv-charu personal divorce)

नेटकऱ्यांनी दोघांच्या निर्णयाला 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) साठी 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचं सांगितलं आहे. यावर देखील चारुने मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, 'याबद्दल मला कोणतही स्पष्टीकरण द्यायचं नाही. मला माहिती नाही लोक याला 'पब्लिसिटी स्टंट' का म्हणत आहेत. आमच्या वकिलांनी देखील आमच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.'

अफवा पसरत असूनही, चारू किंवा राजीव पुढील महिन्यात सुरू होणार्‍या 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होतील की नाही याबद्दल कोणतीही कल्पना दिलेली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजीवने सांगितले की, त्याला प्रसिद्ध टीव्ही रिअॅलिटी शोसाठी संपर्क साधण्यात आला होता. (Rajiv-charu daughter)

 

Read More