Marathi News> मनोरंजन
Advertisement

Good News : वयाच्या 35 व्या वर्षी आई होणार पत्रलेखा; लग्नाच्या 4 वर्षांनंतर बाप होणार राजकुमार राव

Rajkummar Rao and Patralekhaa Gave Good News : राजकुमार रावनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Good News : वयाच्या 35 व्या वर्षी आई होणार पत्रलेखा; लग्नाच्या 4 वर्षांनंतर बाप होणार राजकुमार राव

Rajkummar Rao and Patralekhaa Gave Good News : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्याच्या 'मालिक' या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सगळ्यात त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा लवकरच आई-वडील होणार आहेत. त्या दोघांनी ही बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यानंतर चाहत्यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

राजकुमार रावनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राजकुमार रावनं लिहिलं की 'लवकरच आमच्या आयुष्यात बाळ येणार आहे. (Baby On The Way) पत्रलेखा आणि राजकुमार.' तर त्यासोबत त्यानं 'आनंदीत' असं म्हटलं आहे. तर ही पोस्ट शेअर करत राजकुमार रावनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात सेलिब्रिटी देखील कमेंट करत शुभेच्छा आहे.

राजकुमार रावच्या या पोस्टवर फराह खाननं कमेंट करत म्हटलं की अखेर ही बातमी सगळ्यांना कळली. मला ही गोष्ट माझ्यापर्यंत ठेवायला त्रास होत होता. शुभेच्छा आहेत तुम्हाला. फराहशिवाय पुलकित सम्राट, उर्फी जावेद, कियारा आडवाणी, भारती सिंग, रिद्धिमा कपूर साहनी, हुमा कुरैशी आणि ईशा गुप्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय त्यांच्या चाहत्यांनी हा एक जल्लोष असल्याचं म्हटलं आहे. तर त्यांनी कमेंट करत रेड हार्ट इमोजी शेअर केले.  

हेही वाचा : सलमान खाननं दारू सोडण्यासाठी वापरली 'ही' ट्रिक; कोणत्याही ट्रिटमेन्टशिवाय 'असा' मिळवला कंट्रोल

पत्रलेखा आणि राजकुमार रावनं 2021 मध्ये लग्न केलं. राजकुमार रावनं त्याचा लग्नाचा दिवस हा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात भारी दिवस असल्याचं म्हटलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की राजकुमार रावनं ही घोषणा अर्थात बाप होण्याची घोषणा ही काही दिवसांपूर्वी केली होती. अशात चाहते त्यांनी दिलेल्या या गूड न्यूजला घेऊन खूप आनंदी आहेत. 'मालिक' चित्रपटात राजकुमार रावसोबत मानुषी छिल्लर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर त्यांच्या हा चित्रपट हा 11 जुलै रोजी थिएटमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Read More