Marathi News> मनोरंजन
Advertisement

Rajkummar Rao च्या लग्नपत्रिकेत दडलीये 'ही' गोष्ट

आता त्यांच्या नात्याला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Rajkummar Rao च्या लग्नपत्रिकेत दडलीये 'ही' गोष्ट

मुंबई : बॉलिवूडचे लव्ह बर्ड राजकुमार राव आणि पत्रलेखा त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षणांचा मनमोकळेपणाने आनंद घेत आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर राजकुमार आणि पत्रलेखा आता त्यांच्या नात्याला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

चंदिगडमध्ये या दोघांच्या लग्नाचा जल्लोष सुरू आहे. दरम्यान, आता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका अभिनेत्याच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आली आहे. लग्नपत्रिकेवर लग्नाच्या तारखेपासून लग्नाच्या ठिकाणापर्यंतची पुष्टी करत आहे. लग्नपत्रिका राजकुमार रावच्या वधू म्हणजेच पत्रलेखाच्या बाजूची असल्याचे दिसते. 

लग्नपत्रिकेवर वधू-वरांची म्हणजेच राजकुमार राव आणि पत्रलेखा आणि त्यांच्या पालकांची नावेही लिहिली आहेत. कार्डवर लग्नाची तारीख 15 आहे आणि लग्नाच्या ठिकाणी ओबेरॉय सुखविलास चंदीगडचे नाव लिहिले आहे, जिथे राजकुमार आणि पत्रलेखा यांचा विवाह सोहळा सुरू आहे.

साखरपुड्याचा प्रपोज करतानाचा व्हिडिओ व्हायरल 

लग्नाआधी राजकुमार आणि पत्रलेखा यांचा साखरपुडा झाला. एंगेजमेंटमध्ये राजकुमारने आपली वधू पत्रलेखाला गुडघ्यावर बसवून प्रपोज केले आणि दोघांनीही रोमँटिक शैलीत एकमेकांना अंगठी घातली. या दोघांचे रोमँटिक व्हिडिओ आणि फंक्शनचे फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Read More