Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर राजकुमार रावच्या पत्नीचा बिकीनी लूक, अभिनेताही शर्टलेस 

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा हे बी-टाऊनचं नवविवाहित कपल आहे

लग्नानंतर राजकुमार रावच्या पत्नीचा बिकीनी लूक, अभिनेताही शर्टलेस 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा हे सध्या बी-टाऊनचं नवविवाहित जोडपं आहे. गेल्या महिन्यात 15 नोव्हेंबरला दोघांनी चंदीगडमध्ये सात फेऱ्या घेवून एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली.  सोशल मीडियावर या कपलच्या लग्नाचे फोटो व्हायरल होण्याचं थांबलं नाही की, अभिनेत्याने असा फोटो शेअर केला जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोमध्ये पत्रलेखा बिकिनीमध्ये तर राजकुमार शर्टलेस दिसत आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.  सोबतच लग्न होताच हे कपल अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. राजकुमारने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघंही चिखलाने माखलेले दिसत आहेत. पत्रलेखाने बिकिनी घातली आहे तर राजकुमार शर्टलेस आहे. दोघंही पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. यासोबतच राजकुमारने त्यांच्या लग्नाचाही फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका महिन्यात लग्न
हा फोटो शेअर करून राजकुमारने आपल्या पत्नीला लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'माझे मित्र, माझं प्रेम तू, मेरे दिल भी तुम, दिलदार तुम @patralekha एक महिना झाला आहे.' यासोबतच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. बघता बघता दोघांचे फोटो व्हायरल झाले आणि संपूर्ण बॉलीवूड त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत.

Read More