Marathi News> मनोरंजन
Advertisement

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

एहसान कुरेशी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठं वक्तव्य केलंय. या विधानामुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता आणखी वाढू शकते.

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Raju Shrivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastava) यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीवास्तव यांची प्रकृतीत सुधार व्हावी, यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करतायेत. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात होतं. या दरम्यान आता श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र एहसान कुरेशी (Ahsaan Qureshi) यांनी आपल्या मित्राच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. (raju srivastava close friend ehsan qureshi gave a big health update)

एहसान कुरेशी काय म्हणाले? 

"राजू गेल्या 25 ते 30 तासांपासून बेशुद्ध आहे आणि त्याच्यावर सध्या आयसीयूत उपचार सुरु आहेत", अशी माहिती एहसान यांनी पिंकविलासोबत बोलताना दिली.

"मी दिल्लीला येणार होतो. पण राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांनी मला सांगितलं की, डॉक्टर सध्या कोणालाही भेटू देत नाहीत. म्हणूनच मी आता गेलो नाही.  मी राजूच्या लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करतोय. मी मुंबईत आहे पण त्यांच्या कुटुंबीयांकडून आरोग्याबाबत सातत्याने माहिती घेतोय",असंही एहसान यांनी नमूद केलं. 

Read More