Marathi News> मनोरंजन
Advertisement

राकेश बापट, अनुजा साठेचं ‘व्हॉट्सॲप लव’

राकेश बापट  आणि अनुजा साठे पहिल्यांदाचा एकत्र झळकणार

राकेश बापट, अनुजा साठेचं ‘व्हॉट्सॲप लव’

मुंबई : हिंदी आणि मराठी दोन्ही मनोरंजनविश्वात आपल्या अभिनय कौशल्याने स्वतंत्रपणे नाव कमावलेला राकेश बापट आणि अनुजा साठे हे दोघे ‘व्हॉट्सॲप लव’ बंधनात अडकणार आहेत. येत्या ५ एप्रिल रोजी त्यांचा ‘व्हॉट्सॲप लव’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि मराठी मनोरंजनविश्वात काम केलेले राकेश बापट  आणि अनुजा साठे पहिल्यांदाचा एकत्र झळकणार आहेत. हेमंतकुमार महाले दिग्दर्शित ‘व्हॉट्सॲप लव’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

कृत्रिम संबंध, भावभावना जोपासताना तारेवरची होणारी कसरत आणि भौतिक सुखाचा माग घेताना सांडत चाललेला खरेपणा आणि आलेलं एकाकीपण नव्या संपर्कयंत्रणेच्या माध्यमातून कसं घडतं, हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲप वरून सर्वांशी संपर्कात राहाता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. 

व्हॉट्सॲप वरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबुन असतो. त्यामुळे अनेक समज - गैरसमज निर्माण होतात. पण, थेट संवाद साधण्यासाठी न धजावणाऱ्या व्यक्तिलाही आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं अधिक सोपे वाटू लागल्याने प्रेम प्रकरणात व्हॉट्सॲप मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. 

Read More