Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shamita Shetty बिग बॉसमध्ये गेल्यामुळे राकेश बापट नाराज

'बीग बॉस ओटीटी' शोच्या माध्यमातून राकेश - शमिता एकमेकांच्या जवळ आले, पण...

Shamita Shetty बिग बॉसमध्ये गेल्यामुळे राकेश बापट नाराज

मुंबई : 'बीग बॉस ओटीटी' शोच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आलेले अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट कायम चर्चेत असतात. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं समोर येत आहे. एवढंच नाही तर दोघांनी 'बिग बॉस'च्या घरात त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली. सहसा  'बिग बॉस'मध्ये जुळलेलं नातं फार काळ टिकत नाही असं चाहत्यांना वाटत असतं. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर देखील शमिता आणि राकेश अनेकदा एकत्र दिसले. आता शमिता 'बिग बॉस 15' मध्ये खेळताना दिसणार आहे. 

'बिग बॉस 15'च्या घरात उत्तम डाव खेळण्यासाठी राकेशने शमिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय मी तुझ्यासोबत आहे.. असं देखील राकेश इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाला आहे. 'तुला स्क्रिनवर पाहून मला थोडं वाईट वाटेल. कारण तू माझ्या जवळ नसणार... पण मला माहित आहे. तू चांगलं खेळशील... तू आम्हा सर्वांना अभिमानास्पद वाटेल असं काही करशील. या प्रवासात तुझी साथ देण्यासाठी मी मनापासून तुमच्यासोबत राहीन...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर देखील दोघे एकमेकांना डेट करत आहेत. शिवाय आम्हाला एकमेकांना अधिक जाणून घ्यायचं आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली. रिद्धी म्हणाली, 'या नात्यामुळे राकेश आनंदी आहे तर मी देखील आनंदी आहे... 'ज्याप्रमाणे राकेशने शोमध्ये स्वतःला सादर केलं तसाचं तो खऱ्या आयुष्यात देखील आहे...' असं देखील रिद्धी म्हणाली होती. 

Read More