Marathi News> मनोरंजन
Advertisement

आता ड्रायव्हरनेही राखी सावंतला फसवलं, कार आणि करोडोंची रक्कम घेऊन झाला पसार

Rakhi Sawant Video: राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. राखी सावंत सतत चर्चेत असते. 

आता ड्रायव्हरनेही राखी सावंतला फसवलं, कार आणि करोडोंची रक्कम घेऊन झाला पसार

Rakhi Sawant Video: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आधी पती आदिलकडून फसवणूक, आईचा मृत्यू आणि आता राखी सावंतसोबत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. राखी सावंतचा ड्रायव्हर तिची कार आणि पैसे घेऊन पळून गेला आहे. याचा खुलासा खुद्द राखीने केला आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राखी एका ऑटोमधून फिरतेय

राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी मुंबईच्या रस्त्यांवर  ऑटोमधून फिरताना दिसत आहे. यादरम्यान तिने पापाराझीला पाहताच आपले दुःख सांगायला सुरुवात केली. राखी सावंत फिकट हिरव्या रंगात जिम लूकमध्ये दिसली.

कारचालक पैसे आणि गाडी घेऊन पळाला

राखी सावंतने पापाराझींशी बोलताना सांगितले, 'यूपीमधील माझा ड्रायव्हर पप्पू यादवने काल सर्व पैसे चोरले. बीएमडब्ल्यू कारची चावी, पैसे, सोन्याचा फोन आणि मर्सिडीज कार घेऊन तो फरार झाला आहे. मी त्याचे आधार कार्ड घेतले नव्हते. गरीब बिचारा म्हणत मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तोच गरीब मला चावला. बघा, हजारो किमतीचे कपडे घालून मी ऑटोत फिरतेय, असे राखी म्हणाली.

पोलिसात नोंदवली तक्रार

व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणतेय की, 'मी त्या पप्पू यादवविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात जात आहे. मी चांद्रयान साजरा करत होते आणि पप्पू यादवने माझ्या आयुष्याला ग्रहण लावले.

व्हिडिओ होतोय व्हायरल

राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. राखी सावंत सतत चर्चेत असते. तfच्या प्रत्येक व्हिडिओला भरपूर व्ह्यूजही मिळतात. 

Read More