Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिकण्यासारखं... 'या' 6 वर्षीय स्टार किडनं तिला संभाळणारी ताई अन् हाऊस हेल्पर्सलाही बांधली राखी

Entertainment News : नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आणि या दिवसाच्या निमित्तानं प्रत्येकानं आपआपल्या परिनं हा दिवस साजरा केला. सेलिब्रिटी मंडळीही यात मागे राहिली नाहीत.   

शिकण्यासारखं... 'या' 6 वर्षीय स्टार किडनं तिला संभाळणारी ताई अन् हाऊस हेल्पर्सलाही बांधली राखी

Raksha Bandhan 2023 : नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण नुकताच पार पडला. किंबहुना काही ठिकाणी अद्यापही हा सण साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. भावा- बहिणीच्या नात्याला आणखी घट्ट करणाऱ्या या सणाचा उत्साह सेलिब्रिटींच्या घरीही पाहायला मिळाला. धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढत, व्यग्र वेळापत्रकातून नात्यांना महत्त्वं देत ही मंडळी एकमेकांना भेटली, प्रेमानं एकमेकांची विचारपूस केली आणि हा सण साजरा केला. 

सेलिब्रिटी नवाबांच्या घरीही हा सण तितक्याच उत्साहात पार पडला. आता तुम्ही म्हणाल हे सेलिब्रिटी नवाब कोण? तर, हे सेलिब्रिटी नवाब म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि त्याचं कुटुंब. रक्षाबंधनाच्या निमित्तानं सैफच्या दोन्ही बहिणी सोहा आणि सबा अली खान त्याच्या घरी पोहोचल्या. यावेळी तैमूर आणि जेहच्या बहीणी सारा अली खान आणि चिमुकली इनायाही तिथं होती. 

चिमुकल्या इनायानं खुप काही शिकवलं... 

इनाया म्हणजेच अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या लेकिनं रक्षाबंधनाच्या निमित्तानं सर्वांनाच खुप सुरेख शिकवण दिली. इनायानं तिच्या भावंडांसोबत रक्षाबंधन साजरा केलंच. पण, त्यासोबत तिनं आपला सांभाळ करणाऱ्या ताई आणि घरातील इतर मदतनीसांनाही राखी बांधली. 

सोहा अली खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या खास रक्षाबंधनाचे क्षण सर्वांपुढे आणले. जिथं इनाया या मंडळींच्या कपाळी टीळा लावत त्यांना राखी बांधत असल्याचं पाहायला मिळालं. सख्ख्या किंवा मानलेल्या भावांना आपण कायमच राखी बांधतो. पण, जी माणसं खरचं आपलं रक्षण करतात आपल्यासाठी मेहनत घेतात, आपली काळजी घेतात अशा माणसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा इनायानं निवडलेला मार्ग सर्वांचीच मनं जिंकून गेला. मदतनीसांकडे फक्त कामाच्याच दृष्टीतून न पाहता ही मंडळी आपल्यासाठी जे काही करत आहेत ती अतिशय मोठी बाब असून, आपल्याप्रती त्यांचं हे जबाबदारीनं वागणं एका नात्याचा पायाच आहे हेच इनायाच्या चा कृतीतून सिद्ध झालं.

हेसुद्धा वाचा : SRK च्या 'जवान'ची 1 लाख तिकीटं अचानक विकली गेली! 'गदर' च्या दिग्दर्शकाचे आरोप खरे ठरले?

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soha (@sakpataudi)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soha (@sakpataudi)

नेटकऱ्यांकडून सोहा अली खानचंही कौतुक 

नेटकऱ्यांनी फक्त सोहा अली खानचंच कौतुक केलं नाही, तर तिला ही सुरेख शिकवण देणाऱ्या तिच्या आचं आणि वडिलांचंही कौतुक अनेकांनी केलं. बऱ्याचदा सोहा अली खान आणि कुणाल खेमू त्यांच्या या इवल्याश्या लेकिला बऱ्याच छानछान गोष्टी शिकवत असतात. इनायाही तितक्याच आवडीनं प्रत्येक गोष्ट शिकत असते. ज्यामुळं या साऱ्याची तिला भविष्यात एक चांगली व्यक्ती होण्यासाठी नक्कीच मदत होईल असं म्हणायला हरकत नाही. 

 

Read More