Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहिद-ईशान ते अर्जुन-जान्हवी, बॉलिवूडमधील 5 सावत्र बहीण- भाऊ, ज्यांच्यात सख्ख्या भावंडांपेक्षाही जास्त प्रेम

Raksha Bandhan 2025 : भाऊ बहिणीचं नातं हे खूप खास असतं आणि याच खास नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. तेव्हा बॉलिवूडमधील अशा काही भाऊ बहिणींच्या जोडींविषयी जाणून घेऊयात जे खरंतर सावत्र भावंडं आहेत पण त्यांच्यात सख्ख्या भावंडांपेक्षाही जास्त प्रेम आहे.   

शाहिद-ईशान ते अर्जुन-जान्हवी, बॉलिवूडमधील 5 सावत्र बहीण- भाऊ, ज्यांच्यात सख्ख्या भावंडांपेक्षाही जास्त प्रेम

Raksha Bandhan 2025 : 9 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला जातो. यादिवशी बहीण आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते. बॉलिवूडमधील स्टार कलाकार सुद्धा त्यांच्या कुटुंबात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण अतिशय उत्साहात साजरा करतात. भाऊ बहिणीचं नातं हे खूप खास असतं. आज बॉलिवूडमधील अशा काही भाऊ बहिणींच्या जोडींविषयी जाणून घेऊयात जे खरंतर सावत्र भावंडं आहेत पण त्यांच्यात सख्ख्या भावंडांपेक्षाही जास्त प्रेम आहे. 

अर्जुन कपूर- जान्हवी कपूर : 

अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर हे दोघं बोनी कपूरची मुलं आहेत, पण या दोघांची आई ही वेगवेगळी आहे. बोनी कपूरचं पहिलं लग्न हे मोना कपूर हिच्याशी झालं होतं. अर्जुन कपूर हा बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. तर पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यावर बोनी कपूरने श्रीदेवी सोबत विवाह केला. जान्हवी आणि ख़ुशी या दोघी श्रीदेवीच्या मुली आहेत. पण सावत्र भावंडं असून सुद्धा अर्जुन कपूरचं जान्हवी आणि ख़ुशी सोबतच बॉण्डिंग खूप चांगलं आहे.

शाहिद कपूर - ईशान खट्टर : 

शाहिद कपूरला  नेहमी त्याचा भाऊ ईशान खट्टर सोबत मजामस्ती करताना पाहिले जाते. शाहिद आणि ईशान हे सख्खे भाऊ नाहीत पण त्यादोघांमध्ये खूप प्रेम आहेत. ईशानचं बहिणी मीरा कपूर सोबत सुद्धा चांगलं बॉण्डिंग आहे. शाहिद हा नीलिमा अझीम आणि पंकज कपूर यांचा मुलगा आहे. पंकज कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर, नीलिमा अझीमने राजेश खट्टरशी लग्न केले, आणि ईशान खट्टर हा या दोघांचा मुलगा आहे. 

हेही वाचा : 'सध्या मुलं जन्माला घालू नका' बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीच्या विधानाने एकचं खळबळ

 

सारा अली खान - तैमूर : 

सैफ अली खानची सर्वात मोठी मुलगी सारा अली खान आहे. सारा ही सैफ आणि अमृताची मुलगी आहे. अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफने करीनाशी विवाह केला. ज्यापासून त्याला तैमूर आणि जहांगीर अशी दोन मुले आहेत. सारा आणि करीनाच्या मुलांमध्ये खूप चांगलं नातं आहे.

सलमान खान – अर्पिता : 

सलमान खान याला फॅमिली मॅन सुद्धा म्हटले जाते. सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या भावंडांमधील बॉण्डिंग सुद्धा खूप खास आहे. सलमान त्याची बहीण अर्पितासोबत खूप छान बॉण्डिंग शेअर करतो. पण अर्पिता खान ही त्याची सख्खी बहीण नाही. अर्पिता ही सलमानची सख्खी बहीण नाही. अर्पिता ही अनाथ मुलगी होती जिला सलमानचे वडील सलीम खान यांनी दत्तक घेतले होते.

आलिया भट्ट आणि पूजा भट्ट : 

आलिया भट्ट आणि पूजा भट्ट या दोघी सावत्र बहिणी आहेत. महेश भट्ट यांचं पहिलं लग्न हे किरण भट्ट सोबत झालं होतं. पूजा भट्ट ही त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. तर आलिया भट्ट ही महेश भट्ट आणि सोनी राझदानची मुलगी आहे. 

FAQ : 

सलमान खान आणि अर्पिता यांचे नाते काय आहे?

अर्पिता खान ही सलमान खान यांची सख्खी बहीण नाही. ती एक अनाथ मुलगी होती, जिला सलमानचे वडील सलीम खान यांनी दत्तक घेतले. सलमान आणि अर्पिता यांच्यात खूप खास आणि प्रेमळ बॉण्डिंग आहे.

 शाहिद कपूर आणि ईशान खट्टर यांचे नाते काय आहे?

शाहिद कपूर आणि ईशान खट्टर हे सावत्र भाऊ आहेत. शाहिद हा नीलिमा अझीम आणि पंकज कपूर यांचा मुलगा आहे, तर ईशान हा नीलिमा अझीम आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. दोघांमध्ये खूप प्रेम आणि मजा-मस्तीचे नाते आहे.

बॉलिवूडमधील स्टार्स रक्षाबंधन कसा साजरा करतात?

बॉलिवूडमधील स्टार कलाकार रक्षाबंधनाचा सण आपल्या कुटुंबासोबत उत्साहाने साजरा करतात. ते आपल्या भावंडांसोबत राखी बांधण्याचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा सण खास बनवतात.

Read More