हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर 2' चा टीझर रिलीज करण्यात आला. या टीझरमध्ये सर्वाधिक भाव खाऊ गेली ती कियारा अडवाणी. बिकिनीमधील कियारा अडवाणीला पाहून चाहते घायाळ झाले. कियारा अडवाणी हिने तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. कियाराचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. पण दुसरीकडे चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी तिचा एक फोटो शेअर करताना एक अश्लील कमेंट केली आहे. ज्यासाठी त्याच्यावर बरीच टीका होत आहे.
राम गोपाल यांनी 'वॉर 2' मधील सोनेरी बिकिनी घातलेला कियाराचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने एक अश्लील कॅप्शन लिहिलंय की, देश आणि समाजांऐवजी, जर हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात हे कोण परत मिळवणार यावर युद्ध असेल, तर 'वॉर 2' हा चित्रपट बॅकबस्टर ठरेल. (Ram Gopal Varma lewd comment on Kiara Advani bikini photo Hrithik and NTR war 2 got criticized on social media)
राम गोपाल वर्माने नंतर हे ट्विट डिलीट केलं पण त्याचा स्क्रीनशॉट खूप वेगाने व्हायरल झाला. राम गोपाल वर्मा यांच्या घाणेरड्या कमेंट्समुळे रेडिटवर त्यांच्यावर टीका होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “तो वर्षानुवर्षे वेडा झाला आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की राम गोपाल वर्माची पातळी घसरली आहे, तर काहींनी लिहिले की तो वेडा झाला आहे.
एकाने लिहिलंय, "आरजीव्ही नेहमीच त्याच्या अश्लील कमेंट्समुळे चर्चेत असतो. दुसरीकडे, कियारा अडवाणीने इंस्टाग्रामवर 'वॉर 2' बद्दल एक सकारात्मक आणि भावनिक पोस्ट शेअर केली. तिने लिहिलं, 'हे माझ्यासाठी अनेक प्रकारे पहिले आहे, पहिला YRF चित्रपट, पहिला अॅक्शन चित्रपट, या दोन अद्भुत नायकांसोबत काम करण्याची पहिली संधी, अयानसोबत पहिले सहकार्य आणि हो, माझा पहिला बिकिनी शूट देखील!'
चित्रपटाचा टीझर 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता. टीझरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआरची एन्ट्री अॅक्शन होती, तर कियाराची एन्ट्री ग्लॅमरने भरलेली होती. हृतिक आणि कियारामध्ये रोमान्सची झलकही दिसून आली. कियाराने चित्रपटात पहिल्यांदाच बिकिनी घातली होती आणि टीझर रिलीज झाल्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर याबद्दल माहिती देखील दिली.