Marathi News> मनोरंजन
Advertisement

'रामायण' चित्रपटात भरतची भूमिका साकारणार 'हा' 41 वर्षीय मराठी अभिनेता

रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण' या चित्रपटात भरतची भूमिका साकारणार हा मराठी अभिनेता? 

'रामायण' चित्रपटात भरतची भूमिका साकारणार 'हा' 41 वर्षीय मराठी अभिनेता

Addinath Kothare Role in Ramayan Movie: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.  या चित्ररपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत तर यश रावणाच्या रूपात आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. 

नमित मल्होत्रा निर्मित या 'रामायण'  चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या दरम्यान, एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे की, मराठमोळा अभिनेता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे ‘रामायण’मध्ये भरतची भूमिका साकारणार आहे.

'रामायण' चित्रपटाबद्दल काय म्हणाला आदिनाथ कोठारे? 

नितेश तिवारी दिग्दर्शित या भव्य चित्रपटाचा भाग होण्याबाबत बोलताना आदिनाथ कोठारे यांनी आपली भावना व्यक्त केली. तो Bollywood Hungama शी बोलताना म्हणाला की, ही भूमिका मिळणं हे माझ्यासाठी आशीर्वादासारखं आहे. ‘रामायण’ हा भारतीय सिनेमा क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्तरावरील चित्रपट आहे. याचा भाग बनण्यासाठी मी कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबड्याचा आणि नितेश तिवारी यांचा खूप आभारी आहे. त्यांनी भरतसारखी महत्त्वाची भूमिका मला दिली. नमित मल्होत्रा यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी दिली असल्याचं आदिनाथ कोठारेने म्हटलं. 

आदिनाथ कोठारेकडून नितेश तिवारी यांचं कौतुक

चित्रपटाच्या निर्मात्याबाबत आदिनाथ कोठारे म्हणाला , त्यांचे व्हिजन सुरुवातीपासून खूप स्पष्ट होते. या प्रोजेक्टसाठी त्यांनी जवळपास 10 वर्ष प्री-प्रोडक्शनमध्ये घालवले आहेत. नितेश तिवारी यांनी 2016-17 च्या दरम्यान या गोष्टीची सुरुवात केली होती. तर नमित मल्होत्रा हे व्हीएफएक्सच्या बाजूवर काम करत होते. मला वाटतं लॉकडाऊनच्या आधीच या चित्रपटाचे प्री-प्रोडक्शन सुरू झाले होते.

दरम्यान जेव्हा मी 'रामायण' चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी थक्क झालो. त्यातला परफॉर्मन्स, प्रोडक्शन व्हॅल्यू, व्हीएफएक्स आणि बारीकसारीक तपशील म्हणजे खरंच सोने पे सुहागा आहे. हे आतापर्यंत मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट स्क्रिप्ट्सपैकी एक आहे.

आदिनाथ कोठारे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित नाव असून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. अलीकडेच ते ‘द रॉयल्स’ या वेब सिरीजमध्ये दिसले होते. रामायणसारख्या ऐतिहासिक आणि भव्य प्रकल्पात भरतसारखी भूमिका साकारताना आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या मनात अधिक खोलवर स्थान निर्माण करतील, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

Read More