Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोज्वळ प्राजक्ता माळीचा एवढा बोल्ड अवतार पाहून चाहते हैराण

 मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सोज्वळ प्राजक्ता माळीचा एवढा बोल्ड अवतार पाहून चाहते हैराण

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की.

दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहेत. पानसे यांच्या 'रानबाजार' या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.

'रानबाजार' या सीरिजचा टीझर प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.  यात प्राजक्ता माळी अतिशय बोल्ड अंदाजात इंटीमेट सीन देत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू असल्याचं ऐकू येतं. 
 
हा टीझर शेअर करताना  प्राजक्ताने ''प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.

माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल दिग्दर्शत अभिजीत पानसे आणि मराठीतील सगळ्यात मोठी web series बनवल्याबद्दल प्लॅनेट मराठी ओटीटी आणि अक्षय बर्दापूरकर ह्यांचे आभार. १८ तारखेलाला trailer येतोय, २० ला series येतेय…असे कॅप्शन दिलंय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या वेबसिरीजमध्ये  प्राजक्ता माळीसह तेजस्विनी पंडितही आव्हानात्मक भूमिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसिरीजची प्रतीक्षा आहे, ही मराठी इंडस्ट्रीतील आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज ठरेल असं बोललं जातंय

संबधित बातमी : अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचा बोल्ड सीन पाहून चाहते हैराण, लवकरच प्रदर्शित होणार ही 18+ वेब सीरिज

Read More