Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीर-आलिया लवकरच अडकणार विवाह बंधनात?

जोधपूरमध्ये  रंगणार विवाह सोहळा

रणबीर-आलिया  लवकरच अडकणार विवाह बंधनात?

मुंबई : प्रियांका चोप्रा, दीपिका-रणवीरनंतर आता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर आलिया-रणबीरची लग्नपत्रिका व्हायरल होत आहे. त्यानुसार जानेवारी २०२०मध्ये या जोडीचं जोधपूरमध्ये शुभमंगल होणार असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना चांगलाच जोर चढला आहे.

fallbacks

रणबीर-आलियाच्या नात्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्यात आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र दिसली. त्याचप्रमाणे या प्रेमी युगूलाने त्यांच्या नात्याचा स्वीकार देखील केला आहे. लवकरच रणबीर-आलियाचा ब्रम्हास्त्र चित्रपट  प्रदर्शित होणार आहे. 

लग्नपत्रिका समोर आली असताना दोघांच्या लग्नाची अफवा असल्याचं सांगण्यात येतं आहे. या पत्रिकेत अनेक त्रुटी असून आलियाच्या स्पेलिंग पासून ते आलियाचे वडील म्हणून महेश भट्ट यांच्या नावाऐवजी मुकेश यांचे नाव छापण्यात आले आहे. त्यामुळे ही लग्नपत्रिका चुकीची असल्याचं बोललं जातं आहे.  

Read More