Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलियासोबतच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलला रणबीर...

बॉलिवूडमध्ये वातावरण सध्या थोडं लग्नाळू झालं आहे.

आलियासोबतच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलला रणबीर...

मुंबई : बॉलिवूडमध्ये वातावरण सध्या थोडं लग्नाळू झालं आहे. दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांचा साखरपुडा पार पडला. त्यातच आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे अफेअर चांगलेच गाजत आहे. लवकरच हे दोघेही विवाहबद्ध होतील, अशी चर्चा रंगली आहे. पण यावर रणबीरने मौन सोडले आहे.

रणबीर म्हणतो...

लग्नाविषयी रणबीर कपूर म्हणतो की, लग्नाच्या चर्चा या ज्याच्या त्याच्या व्यवसायाचा एक भाग आहे. एका चर्चेतून दुसरी आणि त्यातून मग तिसरी.. अशा चर्चा रंगत जातात. अशाप्रकारेच अफवा पसरतात. लग्न ही अशी गोष्ट आहे जी योग्य वेळी घडून येते. आता मी ३५ शीचा झालो म्हणून लग्न केलं पाहिजे, असं ठरवून करता येत नाही. तुम्ही आणि साथीदार मिळून यावर विचार केलात तर योग्य वेळी गोष्टी जुळून येतील. पण मी सध्या लग्नाबाबत विचार केलेला नाही. 

अन् अफेअरच्या चर्चांना उधाण आलं

रणबीर-आलिया ब्रह्मास्त्र सिनेमात एकत्र झळकतील. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांत रेशीमगाठी जुळल्या. त्यानंतर सोनम कपूरच्या लग्नात दोघांना एकत्र पाहिलं आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं.

 

Read More