Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोशल मीडियावर आलिया रणबीरचे विवाह फोटो व्हायरल

आलिया रणबीरचे विवाह फोटो व्हायरल

सोशल मीडियावर आलिया रणबीरचे विवाह फोटो व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मागील काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. रिलेशनशिपमध्ये असणारे ही जोडी बी- टाऊनमधील सर्वाधिक लोकप्रिय कपल आहे. सध्याच्या घडीला सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत या जोडीचा समावेश होतो.

आलिया आणि रणबीरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत आलिया ही, नव वधूप्रमाणे नटली आहे. तसेच तिच्या बरोबर रणबीर वरच्या पोषाखात दिसत आहे. या फोटोद्वारे रणबीरचाही हॉट लूक समोर आला आहे. दोघांच्या गळ्यात जयमाला देखील दिसत आहे.

या फोटोमध्ये दोघं विवाह करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो फार झपाट्याने नेटकरी शेअर करत आहे. आलिया आणि रणबीरचा हा फोटो  माय लाईफ लाईन या इन्स्टाग्राम अकाउंटवरून २ सप्टेंबरला शेअर केला होता. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांच्या कमेंन्ट येत आहेत.

fallbacks

आलिया आणि रणबीरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रणबीर आणि आलियाचं खरंच लग्न झालं का? असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. मात्र या फोटोमागचं सत्य हे काही वेगळं आहे. हा फोटो फेक असल्याची माहिती ही सुत्राकडून मिळाली आहे. या फोटोत आलिया खरी आहे, मात्र फोटोशॉपद्वारे रणबीर कपूरचा समावेश करण्यात आला आहे.

आलिया हीने एका ब्रँडसाठी फोटोशूट केलं होता. या जाहिरातीत आलिया अगदी नव्या नवरीप्रमाणे नटलेली दिसत आहे. या फोटोत रणबीरऐवजी दुसराच मॉडेल आहे. सोशल मीडियावर जाहिरातील मॉडेलऐवजी रणबीरला तेथे दाखविलं आहे.

त्यामुळे रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या अफवा या सोशल मीडियावर पसरत आहेत. सध्या या दोघांकडून या फोटोबाबत कोणती प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

 

Read More