Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलिया- रणबीरच्या वेडिंग आऊटफिटची पहिली झलक 

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक क्षणाचे अपडेट्स सोशल मीडियावर समोर येत असतात

आलिया- रणबीरच्या वेडिंग आऊटफिटची पहिली झलक 

मुंबई : बॉलीवूड स्टार्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक क्षणाचे अपडेट्स सोशल मीडियावर समोर येत असतात. या लग्नाबाबत कपूर किंवा भट्ट कुटुंबापैकी कोणीही अधिकृत वक्तव्य जारी केलेलं नाही, मात्र  या लग्नाशी संबंधित सर्व माहिती सोशल मीडियावर समोर येत असते. आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या कपड्याची पहिली झलकही समोर आली आहे.

व्हिडिओ समोर
खरं तर, सर्व पापाराझी लग्नाचं कथित ठिकाण, कृष्णराज बंगल्याच्या बाहेर उपस्थित आहेत. जे चाहत्यांसाठी लग्नाच्या तयारीचे व्हिडिओ आणि फोटो पाठवत आहेत. अशा परिस्थितीत विरल भयानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सब्यसाचीच्या लेबलचे कपडे एका टॅक्सीमध्ये पॅक केलेले दिसले. हे कपडे टॅक्सीतून वेन्यू पर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. हे कपड्यांचे जोड दुसरे-तिसरे कोणाचे नसून रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाचे असल्याचं सांगितलं जात आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणबीर आलियाच्या लग्नाची थीम
आलिया भट्ट लग्नात सब्यसाचीने डिझाईन केलेला लेहेंगा घालणार आहे. मात्र, ती इतर लग्न समारंभात मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या पोशाखात दिसणार आहे. एका वृत्तानुसार, आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत सब्यसाचीने डिझाइन केलेल्या गुलाबी रंगाच्या लेहेंगामध्ये सात फेरे घेणार आहे. यासोबतच आलिया आणि रणबीरचं लग्न पेस्टल थीमवर होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Read More