Marathi News> मनोरंजन
Advertisement

बल्गेरियातल्या सुंदर वातावरणात आलिया - रणबीर साथ-साथ

नुकताच आलियानं इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय

बल्गेरियातल्या सुंदर वातावरणात आलिया - रणबीर साथ-साथ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपला येणारा सिनेमा 'ब्रह्मास्र'च्या शुटिंगच्या दुसऱ्या शेड्युलसाठी बल्गेरियात आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन आर्यन मुखर्जी करतोय. परंतु, सिनेमाच्या बिझी शेड्युलमधूनही वेळ काढून रणबीर - आलिया एकमेकांना क्वालिटी टाईम देताना दिसत आहेत. 

take you wonder by wonder

A post shared by Alia (@aliaabhatt) on

नुकताच आलियानं इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यामध्ये ती एका सुंदर जागेवर उभी आहे... तर दुसऱ्या एका फोटोत आलिया आपल्या टीमसोबत एक सेल्फी घेताना दिसतेय. पण, या फोटोत आलिया आणि तिच्या मैत्रिणींच्या मागे उभा असलेला रणबीरही या फोटोत दिसतोय. 

'ब्रह्मास्र' या सिनेमात बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चनदेखील दिसणार आहे. नुकताच दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुनही या सिनेकलाकारांसोबत सहभागी झालाय. नागार्जुनं नुकताच अभिनेत्री मौनी रॉय हिच्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. 'ब्रह्मास्र' या सिनेमातून नागार्जुन बॉलिवूडमध्ये तब्बल १५ वर्षांच्या अंतरानंतर परतणार आहे. 

Read More