Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर रणबीर - आलियाचा रोमांटिक व्हिडीओ व्हायरल

लग्नानंतर  पहिल्यांदा आलिया - रणबीर सर्वांसमोर रोमांटिक; Video Viral   

लग्नानंतर रणबीर - आलियाचा रोमांटिक व्हिडीओ व्हायरल

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टला एकत्र पाहण्यासाठी चाहते अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत होते. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण आलिया आणि रणबीर 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. आता सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये रणबीर-आलियाचा रोमान्स आणि रणबीरकडे असलेल्या अद्भूत शक्तीचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. सध्या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 

आलिया भट्टने सोशल मीडियावर 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये 'आमच्या हृदयाचा एक भाग... ;ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबरला भेटू...' असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिनेमात आलिया आणि रणबीर शिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक आता सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. 

कसा आहे सिनेमाचा ट्रेलर
'ब्रह्मास्त्र' सिनेमाची कथा शिवा (रणबीर कपूर) नावाच्या व्यक्तीभोवती फिरत असल्याचे दिसत आहे. शिवाकडे अलौकिक शक्ती आहेत, पण त्याबद्दल अभिनेत्याला काहीही माहिती नाही. 

जेव्हा शिवा, ईशाच्या (आलिया भट्ट) प्रेमात पडतो, तेव्हा त्याला स्वतःमध्ये असलेल्या शक्तींची माहिती मिळते. याच शक्तीमुळे ब्रम्हांड वाचू शकतो. अमिताभ बच्चन आणि नागार्जुन या ब्रह्मांडचं रक्षण करताना दिसले, तर मौनी रॉय नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. 

Read More