Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीरच्या आयुष्यात आलिया नव्हेतर 'ही' व्यक्ती खास

रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटचं मोशन पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलं आहे.

 रणबीरच्या आयुष्यात आलिया नव्हेतर 'ही' व्यक्ती खास

मुंबई : रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ब्रह्मास्त्रचं मोशन पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलं आहे. दिल्लीत चित्रपटाच्या स्टारकास्टच्या उपस्थितीत अयान मुखर्जीने हा मोशन पोस्टर रिलीज केलं आणि यासोबतच चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. या कार्यक्रमादरम्यान तिन्ही सेलिब्रिटींनी अनेक खुलासे केले, पण जेव्हा रणबीरने आलियाला असं काही सांगितलं की, अभिनेत्री लाजू लागते, तेव्हाची दृश्यही चाहत्यांच्या हृदयाला भिडली. त्यांचा हा क्यूट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्रम्हास्त्रच्या मोशन पोस्टर लाँन्च इव्हेंटवर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघांची क्यूट बाँन्डिंग सरळ-सरळ दिसत होती. मेगा इव्हेंटवेळी रणबीर कपूरने संधी साधत आलिया भट्टला खूप त्रास दिला.

रणबीरच्या हातात जसा माईक आला तेव्हा तो आलियाला विचारताना दिसला की, ''तुझ्या आयुष्यात R फॅक्टर काय आहे? जिथे पण जातो तिथे लोकं हाच प्रश्न विचारतात. आज या जगाला सांगचं'' रणबीरचं हे बोलणं ऐकून आलिया भट्ट लाजते. आणि पुढे खूप हुशारीने उत्तर देते की, R माझ्या आयुष्यातला नंबर १ आहे. 

यानंतर आलियादेखील रणबीरला सोडत नाही. आणि तिने त्याला A मिनींग काय आहे असं विचारलं.  यावंर रणबीरने उत्तर देत म्हटलं '' माझ्यासाठी A म्हणजे अमिताभ बच्चन, A म्हणजे अयान मुखर्जी यानंतर दोघंही अयान मुखर्जी यांना शोधू लागतात. पण अर्थातच रणबीरच्या आयुष्यात A म्हणजे आलिया भट्टलाच महत्वाच स्थान आहे. रणबीर आलियाचा हा मस्तीचा क्यूट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एककाळ असा होता की, प्रत्येकाच्या जिभेवर एकच प्रश्न होता की, सलमान खान लग्न कधी करणार? हाच प्रश्न आता या कपलला सारखा विचारला जातो. खरं तर काही काळापासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या, मात्र प्रत्येक वेळी तारीख बदलल्याचे ऐकायला मिळतं.

Read More