Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिका, कॅटरीनानंतर आता रणबीर या अभिनेत्रीच्या प्रेमात?

आता या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला रणबीर

दीपिका, कॅटरीनानंतर आता रणबीर या अभिनेत्रीच्या प्रेमात?

मुंबई : जेव्हापासून आलिया आणि रणबीरने आयान मुखर्जी यांच्या ब्रह्मास्त्र सिनेमासाठी एकत्र काम करायला सरुवात केली आहे तेव्हापासून या दोन्ही कलाकारांमध्ये जवळीकता अजूनच वाढली आहे. रणबीर कपूर त्या लंडनच्या मुलीला देखील भेटतो आहे जी त्याच्या आईने त्याच्यासाठी पसंत केली आहे. पण दूसरीकडे आलियासोबत रणबीरचं नाइट-आऊट सुरुच आहे. 3 मेच्या रात्री रणबीर आणि आलिया पुन्हा एकदा एकत्र दिसले. रणबीर आणि आलिया डिनर डेटवर एकत्र पाहिले गेले. दोघांसोबत करन जौहर आणि आरती शेट्टी देखील होती. पण रणबीर आणि आलिया येथे एकत्र आले होते आणि एकत्रच तेथून निघाले.

25 एप्रिलला रात्री रणबीर आणि आलिया जोया अख़्तरच्य़ा पार्टीमध्ये भेटले होते. पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र तेथून निघाले. आलिया रणबीरला भेटण्यासाठी नेहमी त्याच्या घरी देखील जाते. रणबीरला देखील आलियाच्या घरी येतांना अनेकदा पाहिलं गेलं आहे. आलियाचा रणबीरसोबतचं नातं घट्ट होत चाललं आहे. पण आलियाला ही गोष्ट माहित आहे की, रणबीर कपूर याआधी कॅटरीना कॅफ आणि दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांचा आता ब्रेकअप झाला आहे. पण रणबीर हा आलिया नेहमी क्रश होता. दोघांमध्ये जवळीकता वाढल्याने बॉलिवूडमध्ये याची जोरदार चर्चा आहे.

fallbacks

fallbacks

fallbacks

Read More