Marathi News> मनोरंजन
Advertisement

'संजू' सिनेमाची सर्वाधिक छप्परफाड कमाई

रचला नवा रेकॉर्ड 

 'संजू' सिनेमाची सर्वाधिक छप्परफाड कमाई

मुंबई : 'संजू' सिनेमातून पु्न्हा एकदा रणबीर कपूरने बॉक्स ऑफिसवर जोरदार एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वेगळीच जादू पसरवली आहे. हा सिनेमा छप्परफाड कमाई करत असून सगळीकडे याचीच चर्चा आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू ही बायोपिक आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. 

पहिल्याच दिवशी या सिनेमाने केली एवढी कमाई

सर्वाधिक ओपनिंग फिल्म ठरलेल्या संजू या सिनेमाने पहिल्याच दिवशी 32 करोड रुपयांच कलेक्शन केलं आहे. या सिनेमाची ओपनिंग बघता असा विचार केला जात आहे की, हा सिनेमा पुढच्या 3 दिवसांत 100 करोडचा आकडा पार करेल. सिनेमा समीक्षक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू हा सिनेमा यंदाचा सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरणार आहे. पहिल्याच दिवशी संजू या सिनेमाचं कलेक्शन 32 करोड रुपये झालं आहे. संजूने अगदी पहिल्याच दिवशी दबंग खानच्या रेस 3 या सिनेमाचा रेकॉर्ड तोडला आहे. 32 करोडच्या कलेक्शनसोबत संजू हा सिनेमा 2018 हा सर्वाधिक ओपनिंग फिल्म ठरला आहे. 

तसेच तरण आदर्श यांनी देखील ट्विट करून सिनेमाच्या कमाईची माहिती दिली आहे. संजू हा या शुक्रवारचा सगळ्यात हिट सिनेमा ठरला आहे. 

'संजू' या सिनेमातून रणबीर कपूरने बॉलिवूडचा बॅड बॉय ओळखला जाणारा अभिनेता संजय दत्तची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शन केलं आहे. आणि हा सिनेमा देखील सुपरहिट फॉर्म्युला ठरला आहे. 'संजू' या सिनेमाने प्रेक्षकांना सीटवर बसून ठेवण्यात यश मिळवलं आहे. संजय दत्तच्या या बायोपिकची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत होते. आणि अखेर हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला होता.

Read More