Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी आमीरच्या मागे उभा राहणार नाही,' अहंकार दाखवत नाकारली भूमिका; आज पश्चाताप करतोय 'हा' अभिनेता, 'तो चित्रपट केला असता तर....'

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने आपण 'रंग दे बसंती' चित्रपट नाकारल्याचा खुलासा केला आहे.   

'मी आमीरच्या मागे उभा राहणार नाही,' अहंकार दाखवत नाकारली भूमिका; आज पश्चाताप करतोय 'हा' अभिनेता, 'तो चित्रपट केला असता तर....'

बॉक्स ऑफिसवर सध्या 'जाट' चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत, तर रणदीप हुड्डाने नकारात्मक भूमिका साकारली आहे. दरम्यान रणदीप हुड्डाने नुकतंच एका मुलाखतीत आपण रामगोपाल वर्माच्या चित्रपटासाठी 'रंग दे बसंती' नाकारला होता असा खुलासा केला आहे. पण आज आपल्या या निर्णयाकडे मागे वळून पाहताना त्याला जर आपण तो चित्रपट केला असता तर वेगळ्याच लीगमध्ये असतो असं वाटत आहे. 

शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टला रणदीप हुड्डाने हजेरी लावली होती. यावेळी त्याने 'रंग दे बसंती' चित्रपटातील भगत सिंग यांच्या भूमिकेसाठी आपल्याला विचारणा करण्यात आली होती असं सांगितलं. ही भूमिका अखेर अभिनेता सिद्धार्थने निभावली. तो म्हणाला की, "जर मी रंग दे बसंती चित्रपट केला असता तर मी आज वेगळ्या लीगमध्ये असतो. मी ऑडिशन दिलं आणि मलाही ते आवडलं होतं. राकेश ओमप्रकाश मेहरा माझ्याकडे यायचे आणि हा चित्रपट कर असं सांगायचे. ते कधीकधी मद्यावस्थेत असायचे. मी त्यांना नीट गाडी चालवा सांगायचो".

"मला त्यावेळी तो चित्रपट करण्याची इच्छा होती. पण रामगोपाल वर्माने मला सांगितलं की, मी तुला डी चित्रपटात मुख्य भूमिकेत घेण्याचा विचार करत आहे आणि तू पोस्टरमध्ये आमीर खानच्या मागे जाऊन उभा राहणार. माझा जाट अहंकार डोकावू लागला. मी म्हटलं की, मी आमीरच्या मागे उभा राहणार नाही. ते झालं आणि मी रॉक ऑन चित्रपटही याच कारणामुळे सोडला," असा खुलासा रणदीप हुड्डाने केला.

विशिष्ट दिग्दर्शकांची निवड करण्यासंदर्भात रणदीप म्हणाला, "मी नेहमीच वेगळ्या प्रकारचे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. इंडस्ट्रीतील लोकांसोबत फार काम केलं नाहीय. कदाचित त्यामुळेच माझी प्रगती मंदावली होती. मला वाटायचं की मी पुरेसा आहे आणि कला सर्व काही आहे, पण तसं नाही."

रणदीप हुड्डा रंग रसिया, लव आज कल, दो लफ्ज़ों की कहानी, मैं और चार्ल्स, बीबा बॉईज यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. रणदीप हुडाने इम्तियाज अलीच्या 'हायवे'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रसिद्धी मिळवली.

Read More