Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तुम्हीपण माझ्याप्रमाणे मोठी गाडी घ्या,' बायकोच्या पैशांवर कार विकत घेणाऱ्या रणधीर कपूरला राज कपूर यांनी सुनावलं, 'उद्या बसमध्ये....'

रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी आपले वडील राज कपूर यांना तुम्हीदेखील माझ्याप्रमाणे आलिशान कार विकत घ्यायला हवी असा सल्ला दिला होतं. पण त्यावर राज कपूर (Raj Kapoor) यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून रणधीर कपूर यांची बोलती बंद झाली.   

'तुम्हीपण माझ्याप्रमाणे मोठी गाडी घ्या,' बायकोच्या पैशांवर कार विकत घेणाऱ्या रणधीर कपूरला राज कपूर यांनी सुनावलं, 'उद्या बसमध्ये....'

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूड म्हटलं की साहजिकपणे कपूर कुटुंबाचं नाव घेतलं जातं. गेल्या चार दशकांपासून या घराण्यातून अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माते चित्रपट क्षेत्राला लाभले आहेत. यापैकी अनेकांनी हिंदी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेलं. राज कपूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव रणधीर कपूर यांनी एकदा चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं. तसंच आपल्यावर वडील राज कपूर यांचा कसा प्रभाव आहे यावरही भाष्य केलं होतं. 

कपिल शर्माचा कॉमेडी रिअॅलिटी शोमध्ये रणधीर कपूर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी वडिलांनी कशाप्रकारे मूल्ये त्यांच्या मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला याबद्दल सांगितलं होतं. रणधीर यांच्या म्हणण्यानुसार, राज कपूर यांनी त्यांना दिग्दर्शक म्हणून काम देण्यास नकार दिला आणि त्यांना दिग्दर्शक लेख टंडन यांच्याकडे सहाय्यक म्हणून पाठवले, "मालिक का बेटा अपने यहा काम नहीं कर सकता," असं ते त्यांना म्हणाले होते. 

राज कपूर यांनी रणधीर कपूर यांना कुटुंबाच्या गाडीच्या चाव्या घरीच सोडायला लावल्या होत्या. त्याने बसने प्रवास करावा आणि कामावर जाण्याचा संघर्ष समजून घ्यावा अशी त्यांची इच्छा होती.

"मी बस आणि ट्रेनने प्रवास करायचो आणि सुट्टीच्या दिवसांत मी माझ्या वडिलांची गाडी चालवायचो. मग मी अभिनेता झालो आणि मी काही पैसे कमवू लागलो, म्हणून मी लहान गाडीने फिरायचो. एके दिवशी एक भिकारी माझ्याकडे आला आणि माझ्या गाडीची चेष्टा करू लागला. तो म्हणाला, 'तू चित्रपटांमध्ये इतक्या मोठ्या गाड्या चालवतोस आणि प्रत्यक्षात तू अशा गाडीने फिरतोस'. मी थेट घरी गेलो आणि माझी पत्नी बबिताला विचारलं की तुझ्याकडे किती पैसे आहेत? मी माझ्या निर्मात्यांकडून अॅडव्हान्स देखील मागितले आणि स्वतःसाठी नवीन गाडी खरेदी केली," अशी आठवण रणधीर कपूर यांनी सांगितली. 

वडिलांनी नवीन गाडी पाहिल्यावर काय प्रतिक्रिया होती हेदेखील रणधीर कपूर यांनी सांगितलं. "मी माझ्या वडिलांना कार दाखवली. ते फार आनंदी झाले आणि माझं अभिनंदन केलं. मी त्यांना सुचवलं की त्यांनीही अशीच गाडी खरेदी करावी. त्यांच्या स्टेटसला साजेशी गाडी त्यांच्याकडे असावी. त्यांनी उत्तर दिलं की, मुला जरी मी बसने प्रवास केला तरी लोक म्हणतील पाहा राज कपूर बसमध्ये बसले आहेत. लोक तुमच्याकडे पाहतात मग ती कार असो किंवा बस असो".

पाच भावंडांपैकी सर्वात मोठे रणधीर कपूर यांनी 1971  मध्ये अभिनेत्री बबिता कपूरशी लग्न केले. या जोडप्याला करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोन मुली आहेत. दोघींनीही चित्रपटसृष्टीत यशस्वी कामगिरी केली आहे. 

Read More