Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलिया-रणबीरचं डिसेंबरमध्ये लग्न, दोघांच्याही कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया

लवकरच लग्नबंधनात अडकणार आलिया-रणबीर 

आलिया-रणबीरचं डिसेंबरमध्ये लग्न,  दोघांच्याही कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. डिसेंबरमध्ये आलिया-रणबीर विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र याबाबत अद्याप आलिया-रणबीरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र रणबीरचे काका ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर यांनी या दोघांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. पहिल्यांदाच कपूर कुटुंबाकडून लग्नावर प्रतिक्रिया आली आहे. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. रणबीर म्हणाला होता की, कोविड-19 महामारी नसती तर त्याने ब्रह्मास्त्र सहकलाकाराशी म्हणजे आलियाशी लग्न केले असते.

कपूर कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया 

"मला माहित नाही आणि मी ही बातमी ऐकली नाही. त्याचं एक ना एक दिवस लग्न होईल, पण मला याबद्दल काहीच माहिती नाही.'' रणधीर कपूर यांनी आलिया - रणबीरच्या लग्नाबाबत मोठा खूप खुलासा केला आहे. 

आलियाच्या आईची प्रतिक्रिया 

आलियाची आई, अभिनेत्री सोनी राजदान हिने सांगितले की, ती आलिया आणि रणबीरच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे. “हे लग्न कधी होईल हे मला माहीत नाही. मी सुद्धा त्याचीच वाट पाहत आहे,” असे तिने बॉलीवूडलाइफला सांगितले. विचारल्यावर सोनी पुढे म्हणाली, “बरं, अजून बराच वेळ शिल्लक आहे. हे भविष्यात कधीतरी घडेल आणि ते खूप दूर आहे. आता, ते कधी होईल, मला माहित नाही. कदाचित, त्यासाठी तुम्हाला आलियाच्या एजंटला कॉल करावा लागेल, पण तिच्या एजंटलाही कदाचित माहित नसेल.”

गेल्यावर्षी राजीव मसंद यांच्याशी बोलताना रणबीरने सांगितले होते की, मला या करारावर शिक्कामोर्तब करायचे आहे. “मला काहीही बोलून ते जिंक्स करायचे नाही. मला माझ्या आयुष्यात लवकरच ते ध्येय गाठायचे आहे,” तो पुढे म्हणाला आलिया आणि रणबीर त्यांच्या कामाच्या कमिटमेंटमध्ये व्यस्त आहेत. आलियाकडे डार्लिंग्स, आरआरआर, गंगूबाई काठियावाडी आणि जी ले जरा सारखे चित्रपट आहेत, तर रणबीरकडे ऍनिमल आणि लव रंजनसोबत एक अनटाइटल्ड चित्रपट आहे, ज्यात श्रद्धा कपूर आहे. आलिया आणि रणबीरचाही त्यांचा पहिला चित्रपट आहे, अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र, रिलीजच्या प्रतीक्षेत.

Read More